World Aids Day 2023: एड्स हा एक गंभीर आजार आहे. जो जीवघेणा ठरू शकतो. या आजाराबाबत जागरूकता कमी असल्यानेच लोक या आजाराचे शिकार होतात. अशात दरवर्षी 1 डिसेंबरला विश्व एड्स दिवस पाळला जातो. जेणेकरून लोकांमध्ये एचआयव्ही (HIV) आणि एड्सबाबत जागरूकता करावी यावी. पण आजही लोकांना एचआयव्ही आणि एड्समधील अंतर माहीत नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
काय आहे एचआयव्ही?
एचआयव्ही एक व्हायरस आहे ज्याला ह्यूमन इम्युनोडेफिशिएंसी व्हायरस नावानेही ओळखलं जातं. एचआयव्ही तुमच्या इम्युन सिस्टीमच्या सेल्सला संक्रमित आणि नष्ट करतो. ज्यामुळे इतर आजारांसोबत लढण्याची क्षमता कमी होते. या व्हायरसमुळे तुमची इम्युनिटी पूर्ण कमजोर होते. हा व्हायरस इम्यूनोडेफिशियेंसी सिंड्रोम किंवा एड्स (AIDS) चं कारण बनू शकतो.
काय आहे एड्स?
एड्स एचआयव्हीमुळे होणारा आजार आहे जो या इन्फेक्शनची शेवटची आणि गंभीर स्टेज असते. एड्सने पीडित लोकांमध्ये व्हाइट ब्लड सेल्सची संख्या फार कमी होते. तसेच इम्युन सिस्टीमही गंभीरपणे डॅमेज होतं.
एचआयव्ही आणि एड्समध्ये काय फरक?
क्लीवलॅंड क्लिनिकनुसार, एचआयव्ही आणि एड्समध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की, एचआयव्ही एक व्हायरस आहे जो तुमची इम्युनिटी कमजोर करत. तेच एड्स एक असा आजार आहे जो एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यामुळे होतो. एखादी व्यक्ती तोपर्यंत एड्सने पीडित होत नाही, जोपर्यंत तो एचआयव्ही संक्रमित होत नाही. हेही खरं आहे की, एचआयव्हीने पीडित प्रत्येक व्यक्तीला एड्स होत नाही. पण उपचार घेतले नाही तर एड्स आजार होऊ शकतो.
कुणाला होते एचआयव्हीची लागण?
अनेक लोकांचं असं मत आहे की, एचआयव्ही केवळ काही खास लोकांनाच संक्रमित करतो. पण हा मोठा गैरसमज आहे. व्हायरसच्या संपर्कात आल्यावर कुणीही एचआयव्ही संक्रमित होऊ शकतो. अशात हा आजार देहविक्री करणारे लोक, समलैंगिक लोकांना जास्त होऊ शकतो.