शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

World Arthritis Day: जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:09 PM

World Arthritis Day: आर्थरायटिस या आजाराला सर्वसामान्यपणे 'आमवात' म्हटले जाते. वाढत्या वयात होणारा सर्वात कॉमन आजार आहे. हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बदलती लाईफस्टाईलचा समावेश होतो.

आर्थरायटिस या आजाराला सर्वसामान्यपणे 'आमवात' म्हटले जाते. वाढत्या वयात होणारा सर्वात कॉमन आजार आहे. हा आजार होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बदलती लाईफस्टाईलचा समावेश होतो. १२ ऑक्टोबरला वर्ल्ड आर्थरायटिस दिवस जगभरात पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने लोकांना या आजाराबाबत जागरुक केले जाते. 

जर तुम्हाला पायांची बोटे, गुडघे आणि टाचांमध्ये वेदना होत असतील तर समजा की, तुमच्या रक्तात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढलं आहे. हे हात आणि पायांच्या जॉईंटमध्ये क्रिस्टलच्या रुपात गोठतं आणि याने संधिवात होतो. 

किती प्रकारचा असतो आमवात?

आमवात हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो पण सर्वात कॉमन आहे ऑस्टियो-आर्थरायटिस आणि रुमॅटायड आर्थरायटिस. त्यासोबतच इन्फेक्शन आणि मेटाबॉलिज्म आर्थरायटिसच्या केसेसही अधिक पाहण्यात आल्या आहेत. 

ऑस्टियो-आर्थरायटिस

हा वाढत्या वयासोबत सामान्यपणे ५० वयानंतर जास्त त्रास देतो. पण आता बदलत्या लाईफस्टाईलमुळे तरुणांमध्येही ही समस्या बघायला मिळत आहे. यात सामान्यपणे गुडघ्यांवर प्रभाव पडतो. त्यासोबतच बोटं आणि कंबरेतही समस्या होते, पण भारतात जास्त गुडघ्याची समस्या बघायला मिळते. 

रुमॅटायड आर्थरायटिस

हा एक ऑटोइम्यूनिटी असलेला आजार आहे. यात शरीर आपल्याच विरोधात काम करु लागतं. घरात आधी कुणाला हा आजार असेल तर परिवारातील इतरांना होण्याची शक्यता अधिक असते. यात हाताचे कोपरे, बोटं, खांदे, पायांचे जॉईंट्स यात वेदना होतात. नेहमी वेदना शरीराच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही पाय, मनगटांमध्ये होते. यात हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. 

आमवाताची लक्षणे

जॉईंट्समध्ये सूज, असहनीय वेदना, जॉईंट्समधून आवाज येणे, बोटांमध्ये वेदना होणे.

या आजाराची कारणे

ऑस्टियो आर्थरायटिस हा आजार वाढत्या वयामुळे जॉईंट्समध्ये होणाऱ्या कमजोरीमुळे होतो. वयानुसार तुमचं वजन फार जास्त असेल तर तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने ऑस्टियो आर्थरायटिसचं कारण ठरतं. त्यासोबतच एखाद्या जागेवर पुन्हा पुन्हा जखम झाल्यास, टीबीचं इन्फेक्शन झाल्यास किंवा हार्मोन बदल झाल्यास हा आजार होण्याची शक्यता असते. 

कसा कराव बचाव?

नियमीत एक्सरसाईज करा

नियमीतपणे कार्डियो, स्ट्रेथनिंग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा. आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस ४५ ते ५० मिनिटे एक्सरसाईज करा. कार्डियोसाठी जॉगिंग, ब्रिस्क वॉक, स्विमिंग आणि सायकलिंग करु शकता. ब्रिस्क वॉक प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी सोपा आणि फायदेशीर आहे. काही एक्सपर्ट्सचं म्हणनं आहे की, ट्रेडमिलऐवजी पार्कमध्ये जॉगिंग करणे चांगलं आहे. 

लाईफस्टाईल अॅक्टिव ठेवा

फिजिकली तुम्ही जितके जास्त अॅक्टिव्ह असाल तितका आर्थरायटिस होण्याचा धोका कमी असतो. छोटी छोटी कामे आळस न करता स्वत: करा. जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसू नका. कोणत्याही भागावर जास्त दबाव टाकू नका. ऑफिसमध्ये कामातून दर ३० मिनिटांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. 

बॅलन्स डाएट गरजेची

प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले पदार्थ भरपूर खावेत. त्यात पनीर, दूध, दही, ब्रोकली, पालक, राजमा, शेंगदाणे, बदाम यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्या आणि फळेही खावीत. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. 

स्मोकिंग आणि ड्रिकिंग सोडा

धुम्रपान हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी तसेच हाडांसाठी नुकसानकारक आहे. स्मोकिंग सोडल्याने आर्थरायटिसच्या रुग्णांना वेदना कमी होतात आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. जास्त मद्यसेवन केल्याने हाडांना नुकसान होतं.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य