अस्थमा किंवा दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. या आजाराने श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा झालेल्या व्यक्तीला श्वासनलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो. यामुळे रूग्णांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो. खरं तर यामुळे श्वास भरून येतो आणि त्यामुळे सतत खोकलाही येतो. अॅलर्जीमुळे छातीत कफ तयार होतो. या आजाराच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर दुसरीकडे त्यांना श्वास थांबण्याचाही त्रास होतो.
(Image Credit : Medical News Today)
अनेकांचा असा गैरसमज असतो की, उन्हाळ्याच्या दिवसात अस्थमा कमी आढळतो किंवा त्याचा त्रास कमी होतो, त्यामुळे अनेकजण अस्थमाबाबत निष्काळजी होतात. पण असं नाहीये की, उन्हाळ्यात अस्थम्याचा त्रास होत नाही. गरमीच्या दिवसात अस्थम्याचे रुग्ण हे औषधं घेण्यास आणि काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे या दिवसातही अस्थम्याचा अटॅक येऊ शकतो. उन्हाळ्यात अस्थमा येण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
अस्थमा अटॅकची कारणं :
- धूळ आणि वायु प्रदुषण- सर्दीची समस्या- वातावरणातील बदल- इन्फेक्शन- थंड पदार्थांचे सेवन- अॅलर्जी- जेनेटिक कारण - मानसिक तणाव- स्मोकिंग - अल्कोहल
अस्थमाची लक्षण :
श्वास घेण्यास त्रास होणे हे अस्थमाचे पहिले लक्षण आहे. अस्थमा हा आजार एकतर अचानक होतो नाहीतर खोकला, सर्दी या अॅलर्जीच्या लक्षणांनी सुरु होतो. अस्थमाची लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील. ही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.
- श्वास घेण्यास त्रास होणे- छातीत तणाव निर्माण होणे- श्वास घेतांना घाबरल्यासारखं होणे- श्वास घेताना घाम सुटणे- अस्वस्थता जाणवणे
अस्थमाचे प्रकार :
अॅलर्जीक अस्थमा, नॉनअॅलर्जिक अस्थमा, मिक्सड अस्थमा, एक्सरसाइज इनड्यूस अस्थमा, कफ वेरिएंट अस्थमा, ऑक्यूपेशनल अस्थमा, नॉक्टेर्नल किंवा नाइटटाइम अस्थमा, मिमिक अस्थमा, चाइल्ड ऑनसेट अस्थमा, अडल्ट ऑनसेट अस्थमा.
अस्थमा रुग्णांनी या गोष्टींची घ्या काळजी :
- नेहमी सोबत इनहेलर ठेवा.- घर नेहमी स्वच्छ ठेवा.- धूळ-मातीपासून दू रहा. - व्यायाम आणि योगासने करुन शांत व्हा.- तोंडाने श्वास घेऊ नये.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.