आज वर्ल्ड ऑटिज्म अवेअरनेस डे आहे. हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. अनेकदा तुम्ही अशा मुलांना पाहिलं असेल जे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकल्यावर ना आनंदी होत ना हसत ना कोणतीही प्रतिक्रिया देत. कुणाच्याही चेहऱ्याचे हावभाव पाहून ही मुले काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. अशी मुलं-मुली इतरांच्या तुलनेत फार शांत आणि गप्प राहतात. ते त्यांच्याच विश्वात हरवलेली असतात. असे मुलं-मुली ऑटिज्मने ग्रस्त असतात. या ऑटिज्मची लक्षणे काय असतात हे जाणून घेऊ.
काय आहे ऑटिज्म?
ऑटिज्म तंत्रिका आणि विकासाशी संबंधित एकप्रकारचं डिसऑर्डर असतो. सामान्य शब्दात सांगायचं तर हा एक मानसिक आजार आहे. लहान मुलांमध्ये याची लक्षणे त्यांच्या जन्माच्या तीन-चार महिन्यांनंतर ते तीन वर्षांचे होईपर्यंत बघायला मिळतात. जी मुले ऑटिज्मने पीडित असतात, त्यांच्यातील लक्षणे वेगवेगळी बघायला मिळू शकतात. ऑटिज्म झाल्यावर लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्णपणे रखडतो. वेळीच ही लक्षणे ओळखून त्यांच्यावर उपचार सुरु व्हायला हवेत. तज्ज्ञांनुसार, अनेकदा गर्भावस्थेदरम्यान आहार योग्य नसल्याने लहान मुलांना ऑटिज्मचा धोका होऊ शकतो.
आईच्या भावना समजू शकतात
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर(ASD) ने ग्रस्त लहान मुलं इतके आत्मकेंद्री असतात की, ते दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाहीत. सामाजिक होण्यासाठी त्यांना रिअॅक्ट करणं गरजेचं असतं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ऑटिज्मने पीडित मुलं-मुली त्यांच्या आईच्या भावनांना आणि चेहऱ्याच्या हावभावांन तसेच समजू शकतात जसे सामान्य मुलं-मुली समजतात.
विकास थांबतो
या रोगाने पीडित लहान मुलांचा विकास इतरांच्या तुलनेत हळूहळू होतो. कारण यात त्यांचा मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. अशी मुलं समाजात मिसळण्यास घाबरतात. ते प्रतिक्रिया द्यायला सुद्धा फार जास्त वेळ घेतात आणि काहींमध्ये हा आजार भीतीच्या रूपात बघायला मिळतो.
काय असतात ऑटिज्मची लक्षणे
१) या आजाराने पीडित मुलं-मुली त्याच्या आईच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या हावभावांवर काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. ते नजरेला नजर मिळवण्यासही घाबरतात.
२) ते आवाज ऐकल्यावरही प्रतिक्रिया देणे टाळतात.
३) अशा मुला-मुलींमध्ये भाषेसंबंधी समस्याही बघायला मिळतात.
४) अशी मुलं स्वत:च्या विश्वात हरवलेली असतात.
५) अशी मुलं-मुली बोलण्याऐवजी विचित्र आवाज काढतात, याकडे दुर्लक्ष करू नये.