(Image Credit : Social Media)
कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. जर वेळीच कॅन्सरची माहिती मिळाली नाही तर मृत्यूचा धोका अधिक वाढतो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर सर्वात जास्त होतो. स्तन, गर्भाशय, तोंडाचा आणि फुप्फुसाचे कॅन्सरही अधिक होतात. गेल्या २६ वर्षात भारतात कॅन्सरचं ओझं दुप्पट वाढलं आहे.
या आजाराचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत अधिक प्रमाणात जागरूकता पसरवणं गरजेचं आहे. भारतात दुप्पट वेगाने कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. भारतात या रूग्णांची संख्या वाढणं धोक्याची घंटा आहे. कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जर लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपासून बचावासाठी काही टिप्स सांगणार आहोत. येत्या ४ फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिवस आहे. त्यानिमित्ताने या टिप्स...
(Image Credit : forbes.com)
१) लाइफस्टाईलमधील अशा गोष्टी ज्या कॅन्सरचा धोका अधिक वाढवतात, त्यात धुम्रपान, लठ्ठपणा, व्यायाम न करणे आणि खराब आहार घेणे यांचा समावेश आहे. अशात हेल्दी आहार घेणे आणि नियमित एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरतं.
२) शरीरावर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गाठीवर लक्ष द्या, इतर लक्षणे बघा आणि नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसली तर दुर्लक्ष अजिबात करू नका.
३) कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचं सेवन केल्यान कॅन्सरचा धोका वाढतो. तंबाखूचं सेवन बंद करणे हा कॅन्सरला रोखण्याचा एक महत्वाचा निर्णय असेल.
४) पिण्याचं पाणी चांगलं गाळून प्यावे, कारण त्यातील कार्सिनोजेन्स आणि हार्मोन रसायनामुळे तुम्हाला धोका होऊ शकतो.
५) भरपूर पाणी प्यायल्याने आणि इतर तरल पदार्थ सेवन केल्याने मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
(Image Credit : medicalnewstoday.com)
६) सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करा. जसे की, हेल्दी आहार घ्या आण नियमित व्यायाम करा. फळं आणि हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यास मदत मिळेल.
७) फुप्फुसाचा कॅन्सर फार घातक असतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही लसणाचं आणि आल्याचं सेवन केलं पाहिजे. याने फुप्फुसांना आवश्यक ते तत्व मिळतात. आहारात नियमित लसणाचा आणि आल्याचा समावेश करून तुम्ही फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकता.
(Image Credit : theconversation.com)
८) महिलांमध्ये सर्वात जास्त ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. यासाठी मॅमोग्राम केला जातो. ४० वयानंतर नियमित मॅमोग्राम करावं. मॅमोग्राम करून तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका किती आहे याची माहिती मिळवता येते.
९) मद्यपान, धुम्रपान करत असाल तर बंद करा. कारण या सवयींमुळे कॅन्सरचा धोका सर्वात जास्त वाढतो.
१०) एका रिसर्चनुसार, जे लोक आठवड्यातून एक किंवा दोनवेळा तळलेले किंवा भाजलेली पदार्थ खातात त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. तेल जास्त तापमानावर गरम केल्याने कार्सिनोजेनिक कंपाउंड नावाचं नुकसानकारक केमिकल विकसित होतं. याने कॅन्सरचा धोका वाढतो.