World Cacer Day 2022 : ४ फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे असतो. लोकांना या गंभीर आजाराबाबत जागरूक करण्यासाठी, लक्षणांची माहिती देमे आणि बचावाचा उपाय हे लोकांना सांगितले जातात. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू या केवळ कॅन्सरमुळे होतो. कॅन्सरवरील उपचार बरेच उशीरापर्यंत चालतात आणि अनेक लोक या विरोधातील आपली लढाई हरतात. सुरूवातीलाच याची लक्षणं (Cancer Symptoms) माहिती करून घेऊन हा आजार गंभीर होण्यापासून रोखला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ पुरूषांमध्ये कॅन्सरसंबंधी लक्षणं. ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये..
लघवी करताना त्रास - काही पुरूषांमध्ये वय वाढण्यासोबत लघवीची समस्या वाढते. रूग्णाला पुन्हा पुन्हा लघवीसाठी बाथरूमला जाण्याची गरज पडते. अनेकदा लघवी कंट्रोलही होत नाही. लघवी करताना जळजळ जाणवते आणि कधी कधी तर रक्तही निघतं. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्याने ही लक्षणं दिसतात. हा प्रोस्टेट कॅन्सरही असू शकतो. अशी काहीही समस्या जाणवली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.
त्वचेत बदल - जर तुमच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असेल याच्या आकारात किंवा रंगात बदल होऊ शकतो. त्वचेवर काही डाग अचानक दिसू शकतात. जर तुम्हाला असं काहीही दिसलं तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जा. हे स्कीन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.
गिळण्यात त्रास - कॅन्सरमुळे काही लोकांना अन्न गिळण्यात त्रास जाणवू शकतो. जर गिळण्यात त्रास होण्यासोबतच तुमचं वजन अचानक कमी होत असेल किंवा उलटी होत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तुम्ही घसा किंवा पोटाच्या कॅन्सरची टेस्ट करावी.
छातीत जळजळ - जर तुम्हाला छातीत सतत जळजळ होत असेल आणि डाएटमध्ये बदल करूनही ही जळजळ कमी होत नसेल तर तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवं. छातीत जास्त जळजळ होणं पोटाचा किंवा घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
तोंडात बदल - जर तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला माऊथ कॅन्सर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यामुळे तुमच्या तोंडात आणि ओठांवर पांढरे, लाल, भुरक्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे डाग दिसू शकतात. तुम्हाला तोंडात घावही होऊ शकतो जो अल्सरसारखा दिसतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्या.
वेगाने वजन कमी होणे - कोणताही प्रयत्न न करता तुमचं वजन कमी होत असेल तर हे स्ट्रेस किंवा थायरॉइडमुळे होऊ शकतं. या समस्या नसतानाही तुमचं वजन कमी होत असेल तर हे पॅक्रियाज, पोट किंवा लंग कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ब्लड टेस्टच्या माध्यमातून याची माहिती मिळू शकते.
टेस्टिकल्समध्ये बदल - हेल्थ एक्सपर्टनुसार टेस्टिकलमध्ये गाठ, जडपणा किंवा कोणताही बदल दिसत असेल तर अजिबात उशीर करू नका. योग्य वेळेवर याची माहिती मिळाली तर योग्य उपचार घेता येईल.
छातीत बदल - छातीत कोणत्याही प्रकारची गाठ होत असेल पुरूषांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सामान्यपणे पुरूष ब्रेस्टशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे ही समस्या अधिक वाढते. वेळीच डॉक्टरांना संपर्क साधावा.
थकवा - अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये फार जास्त थकवा जाणवू शकतो. आराम करूनही थकवा दूर होत नाही. हा थकवा फार काम केल्यावर येणाऱ्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. जर तुम्हालाही फार थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा..