शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

World Cancer Day: 'या' लसींचा डोस कॅन्सर होण्याची शक्यता करतो कित्यके पटीने कमी, संशोधकच सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 12:16 PM

हिपॅटायटिस बी (Hepatitis B), ह्युमन पॅपिलोमा यांसारख्या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसी (Vaccine) आता उपलब्ध आहेत. या लशींचा डोस घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या व्हायरॉलॉजिस्टनी केला आहे.

काही विशिष्ट विषाणू कॅन्सरला (Cancer) कारणीभूत ठरतात. अशा विषाणूंचा संसर्ग झाल्यावर लगेच नाही, पण काही वर्षांनंतर संबंधित व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता असते. हिपॅटायटिस बी (Hepatitis B), ह्युमन पॅपिलोमा यांसारख्या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसी (Vaccine) आता उपलब्ध आहेत. या लशींचा डोस घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या व्हायरॉलॉजिस्टनी केला आहे.

जगभरात सुमारे २० टक्के कॅन्सर विषाणूंमुळे होतात. एखाद्या व्यक्तीला विषाणूंचा संसर्ग झाल्यावर लगेच कॅन्सर होत नाही. परंतु, हे विषाणू संसर्गग्रस्त पेशींना (Cells) पेशी नष्ट होण्याची नैसर्गिक जैविक क्रिया कशी टाळायची हे शिकवतात. यामुळे, या पेशींमध्ये इतर बदल होतात आणि आगामी काही वर्षांत त्या कॅन्सरचं कारण ठरतात; मात्र लशींच्या मदतीने कॅन्सर रोखला जाऊ शकतो, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ मियामीमधले व्हायरॉलॉजिस्ट रोनाल्ड सी. डेसरोसियर्स यांनी केला आहे. याबाबत त्यांचा संशोधन अहवाल 'द कन्व्हर्सेशन'वर प्रकाशित झाला आहे.

याबाबत डेसरोसियर्स यांनी सांगितलं, की 'विषाणू जिवंत पेशी आणि संसर्गग्रस्त व्यक्तींच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे मायक्रोबायोलॉजिस्ट आणि विषाणू संशोधक म्हणून मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हे विशिष्ट विषाणू रुग्णांना प्रभावित करण्याच्या आणि त्यांच्यावर उपचार करण्याच्या संभाव्य मार्गाच्या दृष्टीने अद्वितीय आहेत.'

हिपॅटायटिस बी आणि ह्यूमन पॅपिलोमा विषाणूविरोधी लशींच्या मदतीनं अनेक व्यक्तींचा कॅन्सरपासून बचाव झाला आहे. ही बाब निर्विवाद सत्य आहे. तरीदेखील अनेक व्यक्ती लशीचा डोस नाकारतात. २०१९ मध्ये, १३ ते १७ वयोगटातल्या ४६ टक्के व्यक्तींना एचपीव्ही (HPV) प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं नव्हतं. परंतु या बाबतीत अमेरिका (US) इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. जपानमध्ये (Japan) २०१३ मधल्या प्रतिकूल घटनांच्या खोट्या अहवालांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाचा दर सध्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. लसीकरण मोहिमेमुळे कांजिण्यांचं निर्मूलन झालं आहे. पोलिओ (Polio), गोवर आणि इतर काही संसर्गजन्य रोगांचंही प्रभावीपणे उच्चाटन झालं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून एचपीव्ही आणि हिपॅटायटिस बीमुळे होणारा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

सर्व ज्ञात विषाणूंना २२ भिन्न फॅमिलीजमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात. यांपैकी पाच विषाणू फॅमिलीज (Virus Families) एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर आयुष्यभर त्याच्या शरीरात राहतात. त्यात असे सात ज्ञात विषाणू आहेत, की ज्यांमुळे कर्करोग होऊ शकतो. यापैकी पाच विषाणू हे पाच फॅमिलीजचा भाग आहेत, की जे शरीरात टिकून राहतात. यात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एचपीव्ही, एपस्टाइन बार, कपोसीचा सारकोमाशी संबंधित विषाणू, टी-लिम्फो ट्रॉपिक विषाणू आणि मर्केल सेल पोलिओमा विषाणूचा समावेश आहे. याशिवाय हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी (Hepatitis C) या दोन विषाणूंमुळेही कॅन्सर होतो. या विषाणूंचा संसर्ग झालेले बहुतेक जण संसर्गाशी लढण्यास आणि त्यांच्या प्रतिकारशक्तीद्वारे विषाणू नष्ट करण्यास सक्षम असतात. ज्या संसर्गग्रस्त व्यक्ती असं करू शकत नाहीत, त्यांना यकृताचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. विषाणूंमुळे होणारा कॅन्सर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो.

एचपीव्ही संसर्ग आणि त्याच्याशी संबंधित कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी पहिल्या प्रतिबंधक लशीचा वापर करण्यास अमेरिकेने २००६ मध्ये मंजुरी दिली होती. एचपीव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं. ही लस सुरक्षित असून, तिचे दुष्परिणामही किरकोळ आहेत. ही लस वयाच्या ११-१२व्या वर्षानंतर दिली जाऊ शकते आणि ती १० वर्षं प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस बी विषाणूची लसही दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग