कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा किती गंभीर आणि जीवघेणा आजार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, जर वेळीच या आजाराची माहिती मिळाली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो. या आजारातून बाहेर आलेली कितीतरी उदाहरणे बघायला मिळतात. अर्थातच यावरील उपचार जरा महागडे आहेत. पण कॅन्सरबाबत लोकांमध्ये फार जागरूकताही बघायला मिळत नाही. अनेकांना वाटतं कॅन्सर एकच किंवा दोनच प्रकारचे असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचे काही प्रकार सांगणार आहोत. जे प्रामुख्याने बघायला मिळतात.
एक्सपर्ट्स सांगतात की, कॅन्सरचे २०० पेक्षा अधिक प्रकार असू शकतात. सोबतच यांची लक्षणेही वेगवेगळी असू शकता. पण आज आम्ही तुम्हाला अशा कॅन्सरबाबत सांगणार आहोत जे जास्त बघायला मिळतात. खासकरून यातील जास्तीत जास्त कॅन्सर असे आहेत ज्यापासून तुम्ही योग्य माहिती घेऊन बचाव करू शकता. चला जाणून सर्वात जास्त होणारे कॅन्सरचे प्रकार कोणते आहेत.
स्कीन कॅन्सर
अलिकडे स्कीन कॅन्सरच्या केसेस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यावर एक्सपर्ट्स सांगतात की, हा कॅन्सर उन्हात जास्त वेळ राहिल्याने, योग्य डाएट न घेतल्याने आणि फिजिकल अॅक्टिविटी न करण्यासारख्या स्थितींमध्ये होतो. हा कॅन्सर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला शिकार करू शकतो. मुख्यत: केसांची त्वचा,चेहरा,ओठ,कान,मान,छाती,हात व विशेषत: महिलांचे पाय या अवयवांच्या त्वचेवर हा विकार होण्याची शक्यता अधिक असते.मेलनोमा हा त्वचेचा कर्करोग गडद रंगाची त्वचा असणा-या लोकांमध्ये अधिक आढळतो.
ब्रेस्ट कॅन्सर
ब्रेस्ट कॅन्सर जास्तीत जास्त महिलांमध्ये बघायला मिळतो. पण याचा अर्थ असा नाही की, हा कॅन्सर पुरूषांना होऊ शकत नाही. ब्रेस्ट कॅन्सर पुरूषांना देखील होऊ शकतो. या कॅन्सरदरम्यान महिलांच्या ब्रेस्टमध्ये सुरूवातीला एक गाठ येते आणि हळूहळू ही गाठ पसरून घातक रूप घेते. यापासून बचाव करण्यासाठी काही संशयास्पद आढळले तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. दुर्लक्ष कराल तर महागात पडू शकतं.
प्रोस्टेट कॅन्सर
प्रोस्टेट कर्करोग तथा प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वयाची पासष्टी ओलांडलेल्या दर शंभर जणांमध्ये किमान २२ जणांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता असते.
ब्लड कॅन्सर
सर्वात जास्त पसरणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्लड कॅन्सर नाव सर्वात आधी येतं. या आजारात व्यक्तीच्या शरीरात ब्लड सेल्समध्ये कॅन्सरचे सेल्स वाढतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ लागते आणि हा कॅन्सर संपूर्ण शरीरात वेगाने वाढू लागतो.
पॅनक्रियाटिक कॅन्सर
पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे अग्नाशयात होणाऱ्या कॅन्सरमुळे व्यक्तीची भूक बाधित होते. सतत कमजोरी, मूड नसणे, उलटी होणे आणि पोटात सतत जळजळ होण्याची समस्या यात होते. हा कॅन्सर साधारणपणे जास्त चरबीयुक्त आहार आणि रेड मीटचं सेवन केल्याने होतो. तसेच प्रदूषित ठिकाणावर जास्त राहणे आणि जास्त स्मोकिंग करणे यामुळेही हा कॅन्सर होऊ शकतो.
लंग कॅन्सर
लंग कॅन्सरमध्ये व्यक्तीची फुप्फुसं वेगाने खराब होऊ लागतात. यात श्वास घेण्यास अडचण होणे, सतत कफची समस्या होणे, हाडे आणि जॉइंट्समध्ये वेदना होणे अशा समस्या होतात. जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. कॅन्सरचा हा प्रकार कधी प्रदूषण आणि स्मोकिंगमुळे अधिक पसरतो.
सर्वाइकल कॅन्सर
ब्रेस्ट कॅन्सरनंतर महिलांमध्ये अधिक आढळणारा कॅन्सर म्हणजे सर्वाइकल कॅन्सर. अनेक महिला आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे या कॅन्सरला वाढण्याची पूर्ण संधी मिळते आणि नंतर हा कॅन्सर जीवघेण्या स्थितीत पोहोचतो. सर्वाइकल कॅन्सरमध्ये महिलेच्या गर्भाशयाच्या कोशिकांमध्ये अनियमित वाढ होऊ लागते, जी नंतर हळूहळू कॅन्सरचं रूप घेते. यात शारीरिक संबंधावेळी प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होणे, प्रायव्हेट पार्टमधून रक्त येणे, फार जास्त थकवा जाणवणे, कंबर आणि पोट दुखणे, चिडचिड वाढणे कोणत्याही कामात लक्ष न लागणे ही प्राथमिक लक्षणे दिसूनय येतात.
ब्रेन कॅन्सर
नावावरूनच हे लक्षात येतं की हा कॅन्सर व्यक्तीच्या मेंदूच्या भागात होतो. ब्रेन कॅन्सरला ट्यूमर नावाने सुद्धा ओळखलं जातं. या स्थितीत ब्रेनमध्ये एक ट्यूमर होतो आणि हळूहळू वाढू लागतो. नंतर हा ट्यूमर व्यक्तीचं संपूर्ण शरीर आपल्या ताब्यात घेतो.
बोन कॅन्सर
बोन कॅन्सर म्हणजेच हाडांचा कॅन्सर. हा कॅन्सर व्यक्तीच्या हाडांवर अटॅक करतो. सामान्यपणे हा कॅन्सर लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्धांना आपला शिकार करतो. याला कारण शरीरात कॅल्शिअमची कमतरता मानलं जातं. ज्या लोकांची हाडे कमजोर असतात त्यांना आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.