आपल्या सर्वांनाच चॉकलेट आवडते. चॉकलेटचे अनेक प्रकार असून विविध चवींमध्येही चॉकलेट्स आढळतात. लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वजण चॉकलेट खाण्याचा मोह आवरू शकत नाही. कोणत्या कार्यक्रमात अथवा कोणाच्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्यासाठीही चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. बऱ्याचदा दात खराब होतील म्हणून चॉकलेट खात नाहीत. परंतु, चॉकलेट्स खाण्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. अशाच काही चॉकलेट्सच्या आरोग्यदायी फायद्यांची माहिती करून घेऊयात...
1. तणाव दूर करण्यासाठी चॉकलेट अत्यंत गुणकारी ठरते. चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो.
2. उच्च रक्तदाबाच्या त्रासावर चॉकलेट गुणकारी असते.
3. हृदयाचे आरोग्य राखण्यासही चॉकलेटचा उपयोग होतो.
4. चॉकलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोकोमध्ये अॅन्टीऑक्सिडेन्ट मुबलक प्रमाणात असते.
5. वजन घटवण्यासाठीही चॉकलेट खाणे हा उत्तम पर्याय आहे. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, चॉकलेट खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
6. चॉकलेटमध्ये असलेले पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडेंट त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा तजेलदार दिसते.
7. चॉकलेट एलडीएल कॉलेस्ट्रॉल आणि चरबी वाढवणाऱ्या इतर आजारांना नियंत्रणात ठेवते. त्यामुळे चॉकलेट खाल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.