शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

World Diabetes Day : तुम्हाला डायबिटीस होतोय याकडे इशारा करतात 'ही' लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 9:59 AM

अलिकडे लोकांना डायबिटीस होण्याचं प्रमाण वाढलं असून लाइफस्टाईलमधे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे कमी वयात लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत.

अलिकडे लोकांना डायबिटीस होण्याचं प्रमाण वाढलं असून लाइफस्टाईलमधे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे कमी वयात लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना हे कळतंच नाही की, त्यांना डायबिटीस आहे. अशात या आजाराची काही सुरूवातीची लक्षणे वेळीच ओळखली तर हा आजार वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळेल.

रात्री पुन्हा-पुन्हा लघवी लागणे

रात्री झोपण्यापूर्वी वॉशरूमला जाणं सामान्य बाब आहे. पण जर हे प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्ही डायबिटीसची टेस्ट करून घ्यावी. या आजाराने प्रोस्टेट टिशूवरही प्रभाव पडतो, त्यामुळे व्यक्तीला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. 

स्किनवर काळे डाग

(Iamage Credit : ncbi.nlm.nih.gov)

तुम्ही तुमच्या स्किनची खूप काळजी घेत असाल आणि तरी सुद्धा मानेवर, हाताच्या कोपरांवर आणि गुडघ्यांवर काळे किंवा निळे डाग दिसत असतील तर वेळीच शुगरची टेस्ट करावी. इन्सुलिनमध्ये गडबड झाल्यावर हे डाग येतात. जर डायबिटीसची माहिती वेळेत मिळाली आणि यावर उपचार घेतले तर हे डागही जातात.

वाचण्यात अडचण

डायबिटीसचा प्रभाव डोळ्यांवरही पडतो. त्यामुळे व्यक्तीची नजर कमजोर होऊ लागते. जर तुम्हाला वाचताना काही अडचण येत असेल तर डोळ्यांची तपासणी करण्यासोबतच एकदा ब्लड शुगर लेव्हलची चेक करा.

अचानक वजन कमी होणे

जर तुमचं अचानक वजन कमी होऊ लागलं असेल तर आनंदी होऊ नका. हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. डॉक्टरांनुसार,  जर तुम्ही हेल्दी डाएट घेत असाल किंवा जास्त खात असाल तरी सुद्धा वजन कमी होत असेल तर डायबिटीसची टेस्ट करावी.

बीपीमध्ये गडबड

जर तुमच्या अनेक प्रयत्नानंतरही ब्लड प्रेशर वाढत जात असेल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डायबिटीससोबत जर बीपी वाढत गेला तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

काय घ्याल काळजी

(Image Credit : healthline.com)

ही लक्षणे डायबिटीसकडे इशारा करतात, पण या आजाराबाबत स्पष्टता ब्लड टेस्टच्या माध्यमातूनच येऊ शकते. टेस्ट रिपोर्ट्वरून स्वत:च अंदाज लावत बसण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवा आणि त्यांना तुमच्या लक्षणांबाबत सांगा. जेणेकरून डायबिटीस नसेल तर शरीराला होत असलेल्या इतर समस्या जाणून घेऊन त्यावर उपचार घेता येतील.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य