शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

World Environment Day: पर्यावरण बिघडल्याने या आजारांचा करावा लागतो सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 10:28 AM

प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेसंबंधी आजार होणे या समस्या होतात. चला जाणून घेऊया प्रदुषणामुळे काय मुख्य आजार होतात.

दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस  (World Environment Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश पर्यावरण सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा आहे. हा दिवस पाळण्याची सुरुवात संयुक्त राष्ट्राने 1972 पासून केली होती. 5 जूनला पहिला पर्यावरण दिवस पाळला गेला होता. यावर्षीची थीम प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणाला नष्ट करणे ही आहे. प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेसंबंधी आजार होणे या समस्या होतात. चला जाणून घेऊया प्रदुषणामुळे काय मुख्य आजार होतात.

1) फुफ्फुसाचा कॅन्सर

अलिकडे प्रदुषण इतकं वाढलंय की, विषारी धुरामुळे लोकांच्या फुफ्फुसांमध्ये विष भरलं जात आहे. आधी तर फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होत होता आणि आता वायु प्रदुषणामुळेही होऊ लागला आहे.

2) डोकेदुखी आणि थकवा

अलिकडे ध्वनी प्रदुषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तुमच्या मेंदुतील सेल डॅमेज होतात आणि तुम्हाला थकवा जाणवायला लागतो. 

3) ब्रोंकायटिस

ब्रोंकायटिस ही फुफ्फूसं आणि श्वासासंबंधीत एक समस्या आहे. ही समस्या केवळ प्रदुषणामुळेच होते. 

4) अस्‍थमा

अस्थमा ही श्वासांसंबधी एक आजार असून याचा अटॅक तुम्ही प्रदुषणाच्या जाळ्यात अडकल्यावर येतो. आजकाल अस्थमा शाळेत जाणाऱ्या मुलांनाही होऊ लागला आहे. 

5) पोटांचे आजार

अनेक दिवस विषारी पदार्थ आणि प्रदुषित पाणी प्यायल्याने तुम्हाला पोटांचे आजार व्हायला लागतात. हायब्रिड फळ-भाज्यांमुळे हे पोटांचे आजार होतात. 

6) मेलानोमा

मेलानोमा हा त्वचेसंबंधी एक कॅन्सर आहे जो ओझोनच्या थेट संपर्कात राहिल्याने होतो. सध्या  ओझोन लेअर फारच फाटली आहे आणि त्याचं कारण प्रदुषणच आहे. 

7) जन्म दोष

जेव्हा तुमचा संपर्क वातावरणात पसरलेल्या विषारी तत्वांशी येतो, तेव्हा ते विषारी तत्व पोटातील गर्भालाही इजा पोहोचवतात. हे विषारी तत्व तुमच्या जीनमध्ये मिश्रित झाले आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स