शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

World Health Day 2017 : डिप्रेशनशी लढताना "या" ५ गोष्टी कराच !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2017 11:56 AM

आज (७ एप्रिल) रोजी जागतिक आरोग्य दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्राने 'डिप्रेशन’ या विषयावर फोकस केला आहे. या निमित्ताने डिप्रेशनशी लढताना काय खबरदारी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.

-Ravindra Moreआज (७ एप्रिल) रोजी जागतिक आरोग्य दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्राने 'डिप्रेशन’ या विषयावर फोकस केला आहे. कारण या आजारामुळे संपूर्ण जगात आतापर्यंत कित्येक जण मृत्युच्या कचाट्यात ओढले गेले आहे. हे गांभिर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने डिप्रेशनशी कसे लढता येईल यावर उपाययोजना करायला हवी. डिप्रेशनशी लढताना काय खबरदारी घ्यावी याबाबत जाणून घेऊया. हे जग आपले वैरी नाहीजेव्हा आपण पूर्णत: निराश आणि हताश होतो, तेव्हा आपणास वाटते की, आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत. आपण हाच विचार करतो की, बाहेरील जग आपणावर लक्ष ठेवून आहे आणि आपल्या चुकांवर बोटं दाखवित आहे, ते आपणावर हसत आहेत. मात्र या गोष्टी निरर्थक आहेत. विशेष म्हणजे या जगात कोणीही आपल्या बाबतीत एवढा कधीही विचार करीत नाही, जेवढे आपणास वाटते. हा केवळ आपला भास असतो. खरे हे आहे की, प्रत्येकजण आपापल्या कामात खूपच व्यस्त आहेत. तर अशावेळी जागृत व्हा आणि या आजाराला जवळही येऊ देऊ नका. आपल्यातला आत्मविश्वास कायम ठेवा. स्वत:वर प्रेम करणे खूप आवश्यक डिप्रेशनच्या स्थितीत आपण स्वत:वर प्रेम करणे विसरतो. जर आपण स्वत:वर पे्रम करणार नाही तर आपण या समस्येपासून कधीही दूर होणार नाहीत. प्रेमाच्या कमतरतेने आपले जीवन निरस होऊ शकते. जो स्वत:वर प्रेम नाही करु  शकत, स्वत:ची काळजी नाही घेऊ शकत तर दुसरे कोणीही आपल्याकडे लक्ष देणार नाही. तर उठा आणि आपल्या आवडीचे काहीही करा ज्यामुळे आपणास संतुष्टता आणि आनंद मिळेल. आपल्या आवडीचा ड्रेस परिधान करुन आपला लुक बदलवा, यामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल. मग पाहा हे जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. हसण्याची कला शिकाडिपे्रशन आपल्याला निराशेच्या खो समुद्रात ढक लून देते. यातून बाहेर पडण्यासाठी हसणे खूप गरजेचे असते. हसण्याने आपले बरेचसे टेन्शन लांब जाते. आपल्या चेहऱ्यावरील हास्यासोबत संपूर्ण जग हसेल. यासाठी हसण्याची कला प्रत्येकाने शिकली पाहिजे. कोणत्याही समस्येवर उपाय आत्महत्या नाहीया जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि कोणतीच समस्या कायमस्वरूपी राहत नाही. यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहा. स्वत:ला संपवून सर्व समस्या सुटतील, असा विचार करणे खूप चुकीचे आहे. असा विचार केल्याने स्वत:ला सामान्य करण्यासाठीची शेवटची संधीदेखील गमवून बसाल. अशावेळी त्या लोकांचाही विचार करा, जे तुमच्यावर खूपच प्रेम करतात, जे आपण बरे व्हावे म्हणून प्रार्थना करतात. प्रत्येक व्यक्तीने समजायला हवे की, वाईट परिस्थिती कायमच नसते. तर संयम सोबतच चांगल्या वेळेचीही वाट पाहा. मदत मागण्यात संकोच नकोडिप्रेशनच्या वेळी मदत मागण्यात संकोच अजिबात बाळगू नका. सोशल मीडियाचा किंवा इतर माध्यमाचा आधार घेऊन आपण अशा लोकांच्या संपर्कात येऊ शकतो जे या आजाराने ग्रस्त आहेत. अशांना भेटून एकमेकांच्या भावना, मनातील भीती समजून घ्या. यामुळे एकमेकांच्या अनुभवाने आपण या समस्येतून नक्कीच मुक्त होऊ शकता. शिवाय अशावेळी आपल्या मनातील सर्व भावना अशा व्यक्तीला शेअर करा जो आपणास समजून घेतो आणि आपले लक्षपूर्वक सर्व ऐकतो. अशावेळी मदत मागताना संकोच अजिबात मनात येऊ देऊ नका. लक्षात ठेवा की, या जगात परिपूर्ण कोणीच नाही, प्रत्येकाला कोणाचीतरी गरज पडतेच. फक्त आपल्यालाच नाही. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या सध्याच्या अहवालानुसार जगात ३० करोडपेक्षा जास्त लोक डिपे्रशनने ग्रस्त आहेत.