शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

World Heart Day 2018 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'या' 4 तपासण्या नक्की करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 11:04 AM

World Heart Day 2018 : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोकं हृदयासंबधिच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारंची नावं ऐकायला मिळतात.

World Heart Day 2018 :  सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये शरीराच्या अनेक नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच अनेक लोक हृदयासंबधीच्या तक्रारींनी ग्रस्त असून त्यामध्येही अनेक वेगवेगळ्या आजारांची नावं ऐकायला मिळतात. हृदय निकामी होणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं, कार्डियक अरेस्ट यांसारख्या समस्यांनी अनेक लोक ग्रस्त असून अनेकांना या रोगांमुळे आपले प्राणही गमवावे लागतात. आज 29 सप्टेंबर संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हृदयासंबंधीचे आजार आणि त्याबाबतची माहिती सांगणार आहोत. कारण याबद्दलची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे.

साधारणतः वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्येच हृदयरोगाची लक्षणं दिसून येत असतं. परंतु सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्येही हृदय रोगाची लक्षणं आढळून येत असून अनेक लोक हृदय रोगांनी ग्रस्त असतात. 

हृदय रोग किंवा हार्ट अटॅकची लक्षणं -

- दिवसभर थकवा जाणवणे

- पोटदुखी, शरीरातील कोणत्याही भागात सूज येणं आणि सतत पोटाच्या समस्यांना सामोरं जाणे. 

- निद्रानाश, चिंता आणि तणाव ही सर्वात मोठी कारणं आहेत. 

- श्वास घेण्यास त्रास होणे

- सतत केस गळणे

डॉक्टरांच्या सल्यानुसार, निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारात योग्य खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर व्यायाम करणंही गरजेचं असतं. यामुळे शरीराचा हृदयरोगापासून बचाव करणं सहज शक्य होतं. परंतु त्यासाठी काही मेडिकल टेस्ट करून डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं असतं.

हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी या 4 तपासण्या करणं गरजेचं :

1. कोलेस्ट्रॉल टेस्टआपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आढळून येतात. एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल एमजी/डीएलमध्ये मोजण्यात येते. जर तुमच्या शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉल 200 एमजी/डीएल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

2. ईकेजी टेस्टजर सतत छातीमध्ये दुखत असेल तर ईकेजी नावाची टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या टेस्टला ईसीजी असंही म्हणतात. या टेस्टमधये रूग्णाच्या शरीरावर छोटे छोटे इलेक्ट्रोड पॅच लावून हृदयाच्या इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यात येतात. 

3. ईसीजी/स्ट्रेस टीएमटीही तपासणी ईसीजीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. या टेस्टमध्ये शरीराला एखादी अॅक्टीव्हिटी देऊन थकवण्यात येतं. त्यानंतर हृदय किती ताण सहन करू शकतं, हे ईसीजी करून चेक करण्यात येतं.

4. सीटी स्कॅनशरीराच्या अनेक अवयवांचं सीटी स्कॅन करण्यात येतं. परंतु फक्त हृदयाचं सीटी स्कॅनही करण्यात येतं. ही तपासणी करताना हृदयाची संरचना, कोरोनरी सर्कुलेशन आणि रक्त वाहिन्यांची स्थिती जाणून घेण्यात येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य