शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

World Heart Day 2020: कोरोना काळात हृदयाला मजबूत ठेवण्यास हवी निरोगी जीवनशैली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 6:22 PM

जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो.

- डॉ. रवी गुप्ता, हृदय रोग तज्ज्ञ, वोक्खार्ट हॉस्पिटल, दक्षिण मुंबईमुंबई - भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि बरेच लोक या आजाराला बळी पडले आहेत. कोरोनासारख्या आजाराच्या संक्रमण काळात वेळीच काळजी न घेतल्यास गंभीर श्वसन विकारांना आमंत्रण देते. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो.कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तीव्र हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, मळमळ होणे, पचन, उलट्या होणे, थकवा जाणवणे आणि हलकीशी डोकेदुखी यांचा समावेश आहे. व्यक्तींनुसार ही लक्षणेही बदलू शकतात. चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक इतिहास ही हार्ट अटॅकची कारणे असू शकतात. जर आपल्याला किंवा आपल्या जवळील एखाद्या व्यक्तीस तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा भविष्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये, असे वाटत असल्यास खाली दिलेल्या या सूचनांचे पालन करा आणि निरोगी राहा.-  जर एखाद्यास तीव्र हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्वरित उपचार घेण्यासाठी रुग्णवाहिकेतून त्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा. त्या व्यक्तीस चालू देऊ नका. वेळेवर देण्यात येणा-या औषधांविषयी डॉक्टरांशी बोला.-  एकदा जर आपण हार्ट अटॅकवर मात केली, तर मात्र दररोज व्यायाम करून शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. आपण घरच्या घरी चालणे किंवा उद्यानात फिरू शकता, एरोबिक्स आणि योगा यांसारख्या पर्यायांची निवड करू शकता. मेडिटेशन सारख्या तणावमुक्त राहण्यास मदत करण्याच्या तंत्रांची मदत घ्या. कोविड १९ सारख्या संक्रमण कालावधीत आपण तणावमुक्त राहावे.-   गरज नसल्यास घराबाहेर जाऊ नका आणि आजारी माणसांच्या आसपास राहणे टाळा, जेणेकरून अधिक समस्या उद्भवू शकतात. आपल्याकडे आपल्याकडे औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, याची खात्री करून घ्या.-   सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करा. आपले तोंड मास्कचा वापर करून झाकून घ्या आणि वेळोवेळी आपले हात स्वच्छ करा. तसेच आपले हात व्यवस्थित धुण्यास आणि हाताची स्वच्छता राखण्यास विसरू नका. हे पाहा की आपण कोणत्याही पृष्ठभागास स्पर्श करीत नाही, कारण डोरकनॉब्ज, डोअर हँडल्स, स्विच इत्यादी या स्त्रोतांमधून संसर्ग होण्याचा धोका आहे.-   संतुलित आहाराचे सेवन करा. निरोगी आणि सक्रिय राहा. जंकफूड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थांचे सेवन टाळा. ताजी फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करायला विसरू नका. आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घ्या. मेदयुक्त पदार्थ, कार्बोहायड्रेट आणि कृत्रिम चव असलेले पदार्थ खाऊ नका. आहारामध्ये कमीतकमी तेलाचा वापर करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेशी झोप घ्या आणि वळोवेळी शारीरिक विश्रांती घ्या.-  दूरध्वनी किंवा व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात राहा. आपल्या प्रियजनांशी मनमोकळ्या गप्पा मारा व तणामुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पेंटिंग किंवा बागकाम आवडत असल्यास नक्कीच आपला वेळ यामध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करा.-  गरज नसल्यास बाहेर न पडता टेलिमेडिसिन किंवा व्हिडीओ कॉलमार्फत सल्ला घेण्याचा पर्याय निवडा.-  वेळोवेळी आपला रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीची पाहणी करा. याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा.