२९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट फेडरेशन कार्डिओवॅस्क्यूलर डिसीजच्यामते (CVD) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी नेहमीच वर्ल्ड हार्ट फेडरेशनकडून गाईडलाईन्स दिल्या जातात. वाढत्या वयात हृदयाच्या आजारांना स्वतः पासून लांब ठेवण्यासाठी सगळ्यात आधी जीवनशैलीत बदल करायला हवा. आज आम्ही तुम्हाला हृदय चांगले आणि निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं याबात टिप्स सांगणार आहोत.
संतुलित आहार घ्या
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत लोक वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे जेवणाच्या वेळा चुकतात. जेवणाच्या वेळा चुकल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. म्हणून जेवणाच्या वेळा चुकवू नका, जास्त तेलकट, फॅटयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. व्हिटामीन, मिनरल्स, प्रोटिन्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
चुकीच्या सवयी वेळीच बदला
उपाय धूम्रपान करू नका, वजन नियंत्रणात ठेवून निरोगी आहार घ्या ज्यामध्ये संपूर्ण धान्य, विविध फळे आणि भाज्या, कमी चरबी किंवा चरबी मुक्त डेअरी उत्पादने समाविष्ट आहेत. संतृप्त किंवा ट्रान्स फॅट, ,साखर आणि मीठ जास्त खाणं टाळा.
पुरेशी झोप घ्या
रोज नियमीत ७ ते ८ झोप न झाल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊन वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. म्हणून लवकर झोपून लवकर उठायची सवय असल्याच मन आणि शरीर नेहमी उत्साहीत राहते. झोपण्याच्या अर्धा १ तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रिन पासून नेहमी राहण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम करा
तुम्हाला व्यायाम करायला फारसा उत्साह वाटत नसेल तर रोज ४५ मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही घरून काम करत असाल तर त्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही. अशावेळी तुम्ही १ तास वेळ काढून चालण्याचा प्रयत्न केलात तर शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहिल. हृदयावर अतिरिक्त ताण येणार नाही. कारण बदलत्या जीवनशैलीत व्यायामाच्या अभावामुळे अनेक जीवघेण्या आजार बळावत आहेत.
ताण तणाव कमी करा
कौटुंबिक समस्या, व्यक्तिगत आयुष्यातील अडचणी आदी कारणाने प्रत्येक व्यक्ती ताणतणावात जीवन जगत आहे. प्रत्येकाचा दिवस तणावानेच सुरु होतो आणि तणावातच संपतो. याचाच परिणाम मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणून आजारी पडल्यास औषधे वेळेवर घ्यावीत, तसेच आजारपणाबाबत जास्त चिंता करू नका.
मित्र किवां नातेवाईकांवर संकट आल्यास शक्य होईल तेवढी मदत अवश्य करावी. परंतु तुमच्या हातात काहीच नसेल तर केवळ विचार करून त्यामध्ये वेळ घालवू नका. तणाव दूर करण्याचा संगीत ऐकणे हा देखील चांगला पर्याय आहे. जेव्हा तणावात असाल तेव्हा आपल्या आवडीचे संगीत ऐका. याने मनाचा थकवा तर दूर होईल शिवाय तणावदेखील कमी होण्यास मदत होईल.