(Image Credit : rnz.co.nz)
सध्या बदलणाऱ्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. वाढणारं वजन, डायबिटीस तसेच हार्ट अटॅकसारख्या आजारांचाही धोका वाढत आहे. सध्या अनेकांना हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागतो. या आजाराची लक्षणं स्त्री-पुरूष दोघांमध्ये दिसून येत असली तरिही पुरूषांपेक्षा महिलांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. अनेकदा छातीत होणाऱ्या वेदनांना महिला नेहमी इग्नोर करतात. पण हे लक्षणं हार्ट अटॅकचं मुख्य लक्षण आहे. जर या लक्षणाकडे दुर्लक्षं केलं तर जीवावरही बेतू शकतं.
आज 29 सप्टेंबर म्हणजेच, वर्ल्ड हार्ट डे. जाणून घेऊया आपलं हृदय आणि त्याच्या आरोग्याशी निगडीत काही अशा गोष्टी ज्या हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात.
(Image Credit : helloimga.pw)
अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून छातीमध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्षं केल्यामुळेच हार्ट अटॅकचा धोका आणखी वाढत असल्याचे सिद्ध झालं आहे. यामध्ये जवळपास 42 टक्के पुरूष तर 30.7 टक्के महिला छातीमध्ये होणाऱ्या वेदनांची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेले आहेत. तसेच संशोधनात सांगितल्यानुसार, हार्ट अटॅकमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, महिला छातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्षं करतात आणि त्या वेदना सहन करतात. जनरल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हार्ट अटॅकमध्ये छातीमध्ये होणाऱ्या वेदना महिला अगदी सहज सहन करतात.
लाइफस्टाइल आणि तणाव ठरतात मुख्य कारणं
धावपळीची लाइफस्टाइल आणि कामाचा ताण यांमुळे आयुष्यात तणाव वाढणं कोणतीही मुख्य गोष्ट नाही. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बदलणारी लाइफस्टाइल आणि तणाव यांमुळे कमी वयातच महिलांना हृदय विकारांचा सामना करावा लागतो.
वयाच्या तिशीतच सुरू होतात समस्या
लठ्ठपणा आणि फिजिकल वर्कआउट न करणं ही हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं आहेत. पाण्याचं कमी सेवन केल्यामुळेही हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे रक्तप्रवाहात बाधा उत्पन्न होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण लाइफस्टाइल आहे. जंक फूड, एक्सरसाइज आणि पुरेशी झोप न घेणं यामुळे ताण वाढतो. अनेक तज्ज्ञांच असं म्हणणं आहे की, आधी वयाच्या चाळीशीनंतर या हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असे. परंतु आता वयाच्या 30व्या वर्षापासूनच हार्ट अटॅकची लक्षणं महिलांमध्ये दिसून येत आहेत.
हृदयविकाराची लक्षणं :
महिलांमध्ये दिसून येणारं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे, छातीत वेदना होणं किंवा अस्वस्थ वाटणं. परंतु विशेषतः स्त्रियांमध्ये अनेकदा काही प्रमुख लक्षणांव्यतिरिक्तही काही लक्षणं दिसून येतात. ती पुढिलप्रमाणे :
- डोकं, जबडा, खांदा दुखणं
- धाप लागणं
- एक किंवा दोन्ही हात दुखणं
- मळमळ किंवा उलट्या होणं
- घाम येणं
- चक्कर येणं
- थकवा येणं
(Imagr Credit : brgeneral.org)
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी महिला काय करू शकतात? हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी महिला आपली जीवनशैली बदलू शकतात, उदाहरणार्थ :
- धूम्रपान करू नका.
- नियमित व्यायाम करा.
- वजन नियंत्रणात ठेवा.
- निरोगी आहार घ्या ज्यामध्ये संपूर्ण धान्य, विविध फळे आणि भाज्या, कमी चरबी किंवा चरबी मुक्त डेअरी उत्पादने आणि दुबईचे मांस समाविष्ट आहेत. संतृप्त किंवा ट्रान्स फॅट, जोडलेले शर्करा आणि मीठ जास्त खाणं टाळा.
(टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)