World Heart Day : वर्ल्ड हार्ट डे दरवर्षी 29 सप्टेंबरला पाळला जातो. हृदयरोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील जास्तीत जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते की, दरवर्षी साधारण 1 कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू केवळ कार्डियोवस्कुलर डिजीजमुळे होतो.
खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलची काळजी न घेणं हृदयरोग आणि हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे. हे आजार इतके घातक झाले आहे की, 30 वयाच्या आजूबाजूलाच याची लक्षण दिसणं सुरू होतात. हे संकेत सामान्य वाटतात, पण ते दिसताच डॉक्टरांकडे जायला हवं.
1) छातीत वेदना
छातीत वेदना किंवा आखडलेपणा वाटणं सामान्य वाटतं, जे अॅसिडिटी, गॅस, अपचन यामुळेही होऊ शकतं. पण रोज यांचा सामना करणं सामान्य बाब नाही आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचं सगळ्यात जुनं लक्षण आहे. जे दिसले की, लगेच डॉक्टरांची मदत घ्यायला हवी.
2) जेवण केल्यावर न पचनं
जर जेवण पचवण्यात तुम्हाला समस्या होत असेल तर हेही हृदयरोगासंबंधी समस्या असू शकते. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, पोटदुखी, पोटात जळजळ किंवा अपचन हृदय कमजोर होण्याकडे इशारा करतात. कारण हृदय, अन्ननलिका आणि पोट तिन्ही आजूबाजूला असतात. ज्यामुळे हृदय आणि पोटदुखीमध्ये अंतर करणं अवघड होतं.
3) सतत आजारी वाटणं
जर तुम्हाला सतत शरीराची स्थिती खराब वाटत असेल आणि आतून आजारी असल्यासारखं वाटत असेल तर हेही हार्ट डिजीजचं लक्षण असू शकतं. यादरम्यान सगळ्यात जास्त काळजी घेण्यासारखी बाब म्हणजे जर तुम्हाला रिकामं बसून असल्यावरही असं वाटत असेल तर हृदयात काहीतरी बिघाड असल्याचा धोका जास्त असू शकतो.
4) जास्त घाम येणे
एखादं काम करताना किंवा गरमीमुळे घाम येणं सामान्य आहे. पण जर शरीर सतत थंड राहत असेल आणि त्यासोबतच घाम व छातीत हलकी वेदना होत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते.
5) श्वास गुदमरल्यासारखं वाटणे
हृदयात काही बिघाड असेल तर नेहमीच छातीतच वेदना होईल असं नाही, याचे संकेत घशातही दिसू शकतात. हृदरोगींना शर्टचं वरचं बटन लावल्यावर श्वास गुदमरल्यासारखा वाटू शकतो. जे एनजायनाचं मुख्य लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
हृदय खराब असल्याची लक्षण
6) हात आणि पायांमध्ये वेदना राहणं
7) जबडा किंवा पाठीमध्ये वेदना
8) टाचांमध्ये वेदना होणं
9) जास्त थकवा जाणवणं
10) असामान्य हार्टबिट