गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. आता काही देशात कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत आहे. अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. डेन्मार्कमध्ये वेगळ्या स्वरूपाच्या SARS-CoV-2 व्हायरसचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन होत आहे. त्यामुळे लस निर्मितीच्या प्रक्रियेत अडचण येऊ शकते.
५ नोव्हेंबरला डेन्मार्कमध्ये सापडलेल्या या १२ रुग्णांमध्ये नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामधील बदलांमुळे डेनिश सरकार एक कोटी 70 लाख उंदीर मारण्याचा विचार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की उंदीर नवीन SARS-CoV-2 साठी कारणीभूत ठरू शकतात.
तज्ज्ञ माईक रायन यांनी सांगितले की, माणसांना पूर्णपणे शास्त्रीय तपासणीसाठी बोलावलं गेलं होतं. हा व्हायरस चीनमध्ये कोरोना संक्रमित उंदरांपासून मनुष्यांमध्ये संक्रमित झाला होता. तेव्हाच, WHO च्या एका अधिकाऱ्याने जिनिव्हामध्ये म्हटलं होतं की, आम्हाला डेन्मार्कमध्ये उंदरांपासून कोरोना व्हायरसची लागण झालेले अनेक लोक आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झालेला दिसून आला. त्यामुळे डॅनिश अधिकारी या निष्कर्षांच्या व्हायरलॉजिकल तपासण्या करत आहेत.
खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा
डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात १५ ते १७ लाख उंदीर आहेत. आरहस विद्यापीठाच्या व्हेटर्नरी अँड वाइल्डलाइफ मेडिसिनचे प्राध्यापक क्रिश्चियन सोन यांनी एका ईमेलमध्ये म्हटलं आहे की, खबरदारी म्हणून आता उंदरांना मारणं हे भविष्यातील आजार रोखण्यासाठी एक चांगले ठरेल. नाहीतर उंदरांच्या माध्यमातून कोरोना पसरला तर त्यांना नियंत्रित करणे कठीण होईल. कोणतीही उपाययोजना नंतर करण्यापेक्षा आधीच समस्यांचा अंदाज बांधून उपाययोजना केलेली फायद्याचं ठरेल.
दिलासादायक! लामा एंटीबॉडीजनी कायमचा नष्ट होणार कोरोना व्हायरस; शास्त्रज्ञांचा दावा
काल जगभरात कोरोना रूग्णांची संख्या ५ कोटींच्या पुढे गेली. आतापर्यंत ५ कोटी ३ लाख ६९ हजार ९४० लोकांना संसर्ग झाला आहे. ३ कोटी ५६ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत जगातील १२ लाख ५७ हजारांपेक्षा लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, डेन्मार्कमध्ये सापडलेल्या या नव्या प्रकारच्या कोरोना स्ट्रेनमुळे चिंता आणखी वाढली आहे.