बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दिनक्रम, प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच यांमुळे किडनीच्या आजारांचाही सामना करावा लागतो. अशातच भारतामध्ये क्रॉनिक किडनीचे आजार होण्याच्या समस्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे. नियमित दिनक्रम आणि संतुलित आहात यांमुळे किडनीच्या आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्हाला काही दिवसांपासून कंबरदुखी, पायांमध्ये सूज इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला किडनीचे विकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या लक्षणांवरून ओळखू शकता तुमची किडनी हेल्दी आहे की नाही?
- किडनीचं महत्त्वाचं काम आहे, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकणं. जेव्हा किडनीच्या या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळी किडमध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणावर जमा होतात. त्यामुळे हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते.
- लघवीचा रंग गडद होतो. जर तुम्ही पाणी कमी पित असाल किंवा तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल तर ही किडनीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याची लक्षणं आहेत. याव्यतिरिक्त लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- लघवीमध्ये रक्त येण्यासारख्या समस्यांचा समना करावा लागत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- शरीरामध्ये कमजोरी, थकवा किंवा हार्मोन्समध्ये होणारी कमतरता म्हणजे किडनी खराब होण्याचं लक्षण आहे.
- ऑक्सिजनचा स्तर कमी होणं ज्यामुळे चिडचिड आणि एकाग्रता कमी होत असेल तर किडनीच्या आजारांचं लक्षण आहे.
- उन्हाळ्यामध्ये थंडी वाजत आणि ताप येत असेल तर किडनी खराब होण्याचे संकेत आहेत.
- किडनी खराब झाल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज आणि खाज येण्यासारख्या समस्या होतात. परंतु असं गरजेचं नाही ही सर्व लक्षणं फक्त किडनीच्या आजारांमध्येच दिसून येतात.
- किडनीच्या आजारामुळे रक्तामध्ये युरियाचा स्तर वाढतो. हा युरिया अमोनियाच्या रूपामध्ये उत्पन्न होतो. ज्यामुळे तोंडातून दुर्गंध येणं आणि जीभेची चव बिघडणं यांसारख्या समस्या होतात.