किडनी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचं काम करते. किडनी विषारी पदार्थ ब्लंडरमध्ये पाठवते. नंतर मुत्राच्या माध्यमातून हे पदार्थ बाहेर फेकले जातात. ज्यावेळी किडनी फेल होते तेव्हा विषारी पदार्थ बाहेर योग्यरित्या शरीराबाहेर फेकले जात नाही. त्यावेळी संपूर्ण शरीर विषारी पदार्थांनी भरून जातं. गंभीर स्थितीत जीव जाण्याचासुद्धा धोका असतो.
किडणी फेल होण्याची लक्षणं
मुत्र कमी प्रमाणात बाहेर येणं, टाचांना सुज, श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं, छातीतील वेदना, मळमळणं, अटॅक येणं ही किडनी फेल होण्याची मुख्य लक्षणं आहेत. अनेकदा लक्षणं दिसत नसतानाही किडनी फेलच्या समस्येचा सामना करावा लागतो.
किडनी फेल होण्याची कारणं
किडणी फेल होण्याची अनेक कारणं आहेत. आजारपणामुळे मुत्राचे प्रमाण कमी होणं, हार्ट अटॅक, हृदयाचा आजार, लिव्हर फेल होणं, प्रदूषण, काही औषधांचे अतिसेवन, डिहायड्रेशन, एलर्जी रिएक्शन, गंभीर इन्फेक्शन, हाय बल्ड प्रेशर.
कोणत्या आजारांमुळे किडनी फेल होते?
किडनी स्टोन, प्रोस्टेट वाढल्यानं युरिनरी ट्रॅकमध्ये रक्त गोढतं. ब्लॅडरवर नियंत्रण ठेवत असलेल्या नसा कमजोर होतात, शरीरात विषारी पदार्थांचा समावेश, अनियंत्रित डायबिटीस, ड्रग्स आणि दारूचे अतिसेवन
किडणी फेल होण्याच्या ५ स्टेज असतात
पहिल्या स्टेजमध्ये सौम्य लक्षणं जाणवतात. त्यानंतरच्या स्टेजमध्ये हेल्दी लाईफस्टाईल, संतुलित डाएट, नियमित एक्ससाईज आणि वजन कमी करून किडणीला बरं केलं जातं. अशा स्थितीत जर तुम्हाला डायबिटीस असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा.
दुसऱ्या टप्प्यातही या आजाराची लक्षणं खूप सौम्य असतात. यादरम्यान मुत्रात प्रोटिन्स असणं तसंच शारीरिक दुरावस्थेबाबत माहिती मिळते. हेल्दी लाईफस्टाईल ठेवून या स्टेजमध्ये हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो. निष्काळजीपणा केल्यानं या स्टेजमध्ये आजार, इंन्फेमेशन किंवा रक्तासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो.
त्यानंतरच्या टप्प्यात किडणीच्या आजाराची लक्षणं दिसून येतात. किडणीचे कार्य व्यवस्थित होत नाही. रक्त तपासणी करून याबाबत अधिक माहिती मिळवता येऊ शकते. हातापायांना सुज येणं, पाठदुखी, मुत्राचा रंग बदलणे अशी लक्षणं दिसून येतात. हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...
चौथ्या टप्प्यात किडनीचा आजार गंभीर होतो. जवळपास किडनी फेलच होते. अॅनिमिया, हाय ब्लड प्रेशर आणि हाडांच्या समस्येचा सामना करावा लागतो. या स्टेजच्या आधीच डॉक्टरांशी संपर्क साधून औषधं घेण गरजेचं आहे. पाचव्या टप्प्यात उलटी, श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचेवर खाज येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा स्थितीत डायलिसीस किंवा किडनी ट्रांसप्लांटची गरज भासते. निरोगी जीवनशैली, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही किडनी फेलच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हालाही उद्भवू शकतो किडणीचा आजार; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं आणि बचावाचे उपाय