आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. तुम्हीही सकाळी फिरायला गेल्यावर अनेकांना जोरजोरात हसताना पाहिले असेल. हा नजारा बघणे जरा विचित्र ठरु शकतं पण हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी 'वर्ल्ड लाफ्टर डे' साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे, 1998 या दिवशी डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 70 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याच्या फायद्यांबाबत जागरूक करणं हाच आहे. जाणून घेऊया वर्ल्ड लाफ्टर डेच्या निमित्ताने हसण्याच्या काही फायद्यांबाबत...
- हसण्यामुळे शरीराला एकप्रकारे ऊर्जा मिळते. त्यामुळे आयुष्य वाढते. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दु:ख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतो.
- चेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो.
- हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. तसेच आजारही दूर ठेवता येतात.
- ज्यांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते. तितक्या ह्दयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.
- आपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. कारण की, हसण्यामुळे काम किंवा वाचनावर लक्ष केद्रिंत होते. त्यामुळे आपली गुणत्ता सिद्ध होते.
- हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी हसणे हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख व उत्साह असणाऱ्या व्यक्तिकडे लोक आकर्षिंत होत असतात.
- हसण्यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. त्यामुळे कितीही तणाव असला तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
- हसत राहिल्याने चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वाढणारे वजनही नियंत्रीत ठेवता येते. जास्त खाणे व तणाव या गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.
- हसल्याने शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील होतो. त्यामुळे शरीराचा भागात होत असलेला हसण्यामुळे कमी होतो. पेन किलरप्रमाणे हा रासयनिक घटक काम करतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.