जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतीक कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो. भारतात हा दिवस ३० जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी कुष्ठरोगाविषयी जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाची सुरूवात १९५४ मध्ये करण्यात आली. कुष्ठरोग हा एक हान्सेंस आजार आहे. अनुवांशिक आजार सुद्धा आहे. यानिमित्ताने कुष्ठरोगाच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’ या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.
कुष्ठरोगाच्या व्यक्तीसोबत आजसुद्धा चुकीची वागणूक केली जाते. त्यामुळे त्यांना समाज आणि समाजातील लोकांपासून त्यांना वेगळं रहावं लागतं. रूग्णाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळे हा आजार वाढत जातो. या आजाराचे संक्रमण हवेतून बॅक्टिरीया पसरून होत असते. खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हा आजार इतरांपर्यंत पोहोचला जातो. जर इतर व्यक्तीच्या श्वासांमार्फत बॅक्टिरीया शरीराच्या आत गेले तर कुष्ठरोगाची लागण होऊ शकते. तर आज आम्ही तुम्हाला कुष्ठरोगाची कारणं लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत.
लक्षणं
त्वचा असंवेदनशील होणे.
न खाजणारे , न दुखणारे चट्टे येणे.
जाड, तेलकट त्वचा होणे.
नसांमध्ये वेदना होणे.
सतत थकवा येणे.
हातपाय, छाती, पाठ अशा सर्व ठिकाणची त्वचा जंतूंची बेसुमार वाढ झाल्याने लालसर, सुजलेली व चकचकीत दिसू लागते. कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान व योग्य उपाययोजना करून रोग बरा करणं शक्य आहे. ( हे पण वाचा - तुमच्या 'या' सवयींमुळे होऊ शकता जीवघेण्या आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध)
कुष्ठरोगाचे प्रकार
ट्युबरकोलाईड आणि लॅप्रोमॅट्स हे दोन कुष्ठरोगाचे प्रकार आहेत. या आजारात काही प्रमाणात त्वचेचा त्रासाचा सामना करावा लागत असतो. ट्युबरकोलाईड या प्रकारात त्वचा व त्वचेजवळची नस याला संसर्ग होतो. त्वचा जाड होऊन, लाल होणे, त्यातून द्रव येणे, ताप असणे, अंगाला खाज येणे, नसांना संसर्ग होऊन व त्या भागाची आग होणे, नसा जाड होणे व काहीवेळा अवयवाचे काम कमी होणे ही लक्षणं जाणवतात. लॅप्रोमॅट्स या दुसऱ्या प्रकारात त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठून त्याचे रूपांतर गोल आकाराच्या गाठींमध्ये तायर होते. कालांतराने या गाठी खूप मोठ्या व वेगळ्या आकाराच्या होतात. ( हे पण वाचा-सावधान! तरूण वयात केलेल्या 'या' चुका तुम्हाला आई होण्यापासून रोखू शकतात...)
कुष्ठरोगावरचे उपाय
कुष्ठरोगावर उपचार केले जाऊ शकतात. डब्ल्यूएचओद्वारे १९९५ मध्ये मल्टी ड्रग थेरेपी विकसीत करण्यात आली होती. ही या आजारासाठी प्रभावी ठरली. भारत सरकारद्वारे कुष्ठरोगाचा उपचार मोफत करून देण्यात येतो. अनेक लोकं त्यांचा सोबत होत असलेले भेदभाव आणि समाजात असणारे गैरसमज यांमुळे लोक कुष्ठरोगाचे उपचार घेण्यासाठी खूप विचार करतात. जर कुष्ठरोगापासून बजाव करायचा असेल तर इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहणं टाळा. पण कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर व्यक्ती समाजात इतर व्यक्तींप्रमाणे राहू शकतो.