World Liver Day : फॅटी लिव्हर डिजीज एक असा आजार आहे ज्यात लिव्हरच्या कोशिकांमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होतं. हा आजार आजच्या काळात कॉमन झाला आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आज प्रत्येक ३ पैकी एका व्यक्तीला हा आजार आहे. या आजारामुळे लिव्हर योग्यप्रकारे काम करत नाही आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. काही लोकांना वाटतं की, जे लोक जास्त मद्यसेवन करतात, केवळ त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. पण असं ना हीये. जे लोक मद्यसेवन करत नाही, त्यांनाही हा आजार होतो.
पण हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, जे लोक मद्यसेवन अधिक प्रमाणात करतात त्या लोकांमध्ये ही समस्या जास्त दिसते. ज्या लोकांनी कधीच मद्यसेवन केलं नाही त्यांच्यातही ही समस्या दिसते, पण त्याची कारणे वेगळी असू शकतात. जसे की, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, स्लीप एपनिया, अंडरअॅक्टिव थायरॉइड इत्यादी. जास्तीत जास्त केसेसमध्ये सुरूवातीला या आजाराबाबत माहिती मिळत नाही. नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हर डिजीज एक अशी स्थिती आहे जी मद्यसेवनामुळे होत नाही, पण जर मद्यसेवन केलं तर ही समस्या वाढू शकते.
वाढतं वजन असू शकतं कारणीभूत
ब्रिटिश लिव्हर ट्रस्टचे चीफ एक्झीक्यूटीव्ह ऑफिसर पामेला हीली म्हणाल्या की, अनेक लोकांना हेही माहीत नसतं की, व्यक्तीचं वाढतं वजनही फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकतं. लिव्हर हार्ट प्रमाणेच महत्वाचं अवयव आहे. पण लोक त्याला निरोगी ठेवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत.
लिव्हरबाबत अनेक गैरसमजही पसरलेले आहेत. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना वाटतं की, लिव्हरचा आजार त्या लोकांना होतो जे लोक मद्यसेवन करतात. पण असेही काही लोक आहेत जे मद्यसेवन करत नाहीत तरीही वाढत्या वजनामुळे त्यांना फॅटी लिव्हरचा धोका असतो.
सुरूवातीला दिसत नाही लक्षणं
प्रत्येक व्यक्तीच्या लिव्हरमध्ये फॅटचं काही प्रमाण असतं. पण जसंजसं लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण वाढतं. त्यांना हाय ब्लड प्रेशर, किडनी समस्या आणि डायबिटीसचा धोका वाढू लागतो.
सुरूवातीला फॅटी लिव्हर डिजीजचे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण जर याला कंट्रोल केलं गेलं नाही तर गंभीर लक्षणे समोर येऊ शकतात. यानंतर ही समस्या नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस किंवा NASH नावाच्या एका आणखी गंभीर स्थितीत रूपांतरित होऊ शकते. ज्यात लिव्हरमध्ये सूज येऊ शकते. जसाजसा वेळ पुढे जातो ही सूज ब्लड वेसिल्स आणि लिव्हर दोन्हींना प्रभावित करू लागते. असंही होऊ शकतं की, सामान्य माणसाला हे समजूनही नये की, त्याच्या लिव्हरमध्ये समस्या झाली आहे.
काही मुख्य लक्षणे
नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, जर कुणाला फॅटी लिव्हर डिजीजची समस्या होते तेव्हा त्यांच्यात खालील काही लक्षणे दिसतात.
- पोटाच्यावर उजव्या भागात वेदना
- जास्त थकवा जाणवणे
- प्रमाणपेक्षा जास्त वजन कमी होणे
- अत्याधिक कमजोरी जाणवणे
लिव्हरला जर अनेक वर्षांपासून नुकसान पोहोचत असेल तर ते सिरोसिसमध्ये बदलतं. सिरोसिसमुळे लिव्हरला जे नुकसान होतं, ते बरोबर केलं जाऊ शकत नाही. अशा स्थितीत काही लक्षणे दिसतात.
- त्वचेवर पिवळेपणा येणे
- डोळे पांढरे होणे
- त्वचेवर खाज येणे
- पाय, टाचा किंवा पोटावर सूज येणे
लाइफस्टाईलमध्ये करा बदल
एक्सपर्ट सांगतात की, या आजारापासून वाचण्यासाठी सर्वातआधी लाइफस्टाईलमध्ये बदल करण फार गरजेचं आहे. एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीमध्ये लिव्हर रिसर्चचे हेड प्रोफेसर जोनाथन फॉलोफील्ड सांगतात की, नॉन-अल्कोहोलीक फॅटी डिजीजमध्ये रूग्ण २०३० पर्यंत ५ टक्के ते ७ टक्के वाढू शकतात. अनेकांना त्यांना हा आजार झाल्याचं माहीत नसतं. जे लोक असे असतात जे बाहेरून सडपातळ दिसतात, पण त्यांच्या लिव्हरवर फॅट असतं. त्यांच्या पोटाच्या चारही बाजूने चरबी जमा असते आणि त्यांना थकवा जाणवतो.
फॅटी लिव्हर डिजीज कमी करण्यासाठी काय करावं?
फॅटी लिव्हर डिजीजपासून वाचवण्यासाठी काही गोष्टींकडे खास लक्ष द्यावं लागतं. एक्सपर्ट सांगतात की, अशा लोकांनी ७ ते १० टक्के वजन कमी करावं. एरोबिक एक्सरसाइज किंवा हलका वेट ट्रेनिंगनेही लिव्हरला फायदा होतो. यासाठी डॉक्टर डायबिटीस कंट्रोल करण्याचाही सल्ला देतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.