World Lung Cancer Day 2022: दरवर्षी 1 ऑगस्टला वर्ल्ड कॅन्सर डे पाळला जातो. या दिवशी फुप्फुसाच्या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा उद्देश आहे. लोकांना त्यांच्या सवयींबाबत सांगणं आहे ज्यामुळे त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. फुप्फुसं म्हणजे लंग्स शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. फुप्फुसांच्या माध्यमातून श्वास घेताना ऑक्सीजन शरीरात प्रवेश करतो.
वाढतं प्रदूषण, धूळ, विषाणू संक्रमणामुळे फुप्फुसं कमजोर होतात. ज्यामुळे अस्थमा, श्वसनासंबंधी आजार होतात. या फुप्फुसांमध्ये कफ जमा होऊ लागतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
फुप्फुसं मजबूत ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार अनेक औषधी वनस्पती फुप्फुसासाठी फायदेशीर असतात. यातील काही महत्वाच्या औषधींबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
पिंपळी
पिंपळीचे मूळ, फळ व खोड उपयुक्त आहेत. कफ, दमा, वात, खोकला, ताप, मूळव्याध, कावीळ आणि कुष्ठरोग या विकारांवर हे भाग उपयुक्त आहेत. श्वसनप्रणालीसाठी पिंपळी फार फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, पिंपळीचं रोज एक एक करून दूधासोबत 15 दिवस सेवन करा आणि त्याच क्रमाने सेवनाचा क्रम कमी करा. याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. पिंपळीचं मधासोबत सेवन केलं तर सर्दी खोकलासारख्या श्वसनासंबंधी समस्या दूर होतील.
सूंठ
सूंठ म्हणजे सुकलेल्या आल्याने फुप्फुसात संक्रमणामुळे झालेली सूज कमी होते. सूंठ श्वसननलिका स्वच्छ राहण्यास मदत मिळते. सूंठाने गळ्यातील सूज कमी होऊन खवखव आणि खोकल्यापासून आराम मिळतो. याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
बेहडा
बेहडा ही एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी आहे. या फळाने खोकला, सर्दी आणि गळ्यातील खवखव दूर होते. आयुर्वेदानुसार, बेहडा सर्व प्रकारच्या खोकल्यावर आणि श्वसनप्रणाली संबंधी रोगांमध्ये फायदेशीर आहे. याने गळ्यातील सूज कमी होते आणि वाढलेला कफ बाहेर निघतो. याने श्वसनमार्गाला आराम मिळतो.
ज्येष्ठमध
आयुर्वेदानुसार, ज्येष्ठमधाने श्वसनासंबंधी संक्रमणातून आराम मिळतो. ज्येष्ठमधाचा वापर सर्दी आणि खोकलासारख्या अनेक श्वसनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यामुळे घट्ट कफही दूर होतो आणि फुप्फुसांना आराम मिळतो.
तुळशी
तुळशी एक फारच गुणकारी औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांमध्ये याचा वापर केला जातो. तुळशीच्या पानांमध्ये यूजेनॉल नावाचं तत्व आढळतं. जे सर्दी, खोकला सारख्या समस्या दूर करतं. याने फुप्फुसांना आराम मिळतो. रोज तुळशीच्या पानांचं सेवन केलं तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे तुम्हाला फुप्फुसासंबंधी कोणत्याही आजारांचा धोका राहत नाही.