दरवर्षी 10 ऑक्टोबरला जगभरात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजेच, जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणं हा यामागील दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आजारांबाबत गांभीर्य निर्माम करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
जर एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या जाणवत असतील तर त्यांनीशांत न बसता याबाबत आपल्या जवळच्या लोकांना सांगितले पाहिजे. तसेच गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
दरवर्षी 40 सेकंदांमध्ये एक व्यक्ती करते आत्महत्या...
WHOच्या आकड्यांनुसार, जगभरामध्ये प्रत्येक 40 सेकंदांमध्ये एक व्यक्ती आत्महत्या करते. या आकडेवारीनुसार, दरवर्षी जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. आत्महत्या कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नाही. तर त्यासाठी अनेक कारणं असतात. मानसिक आजार, डिप्रेशन, एग्जायटी यांसारखी अनेक कारणं माणसाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात.
तरूणांमध्ये वाढत आहेत मानसिक समस्या
आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की, तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक समस्या दिसून येत आहेत. खासकरून 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मानसिक आजारांना रोखणं शक्य असतं. परंतु, तेव्हाच जेव्हा यावर लक्ष देण्यात येईल. जास्तीत जास्त लोक आपलं शरीराची काळजी घेतात. आपलं आरोग्य जपतात पण आपल्या मेंदूकडे दुर्लक्षं करतात.
मानसिक आजार उद्भवण्याची कारणं...
जर मानसिक आजारांवर पूर्ण लक्षं केंद्रित केलं तर मानसिक आजार मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी मदत होते. कामाशी निगडीत तणाव, रिलेशनशिपचा स्ट्रेस, पैशांशी निगडीत तणाव, इमोशन्स, एंग्जायटी म्हणजेच अस्वस्थता इत्यादी अनेक फॅक्टर्स आहेत जे व्यक्तीचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
मानसिक आरोग्य राखण्यासाठी काही उपाय...
बॅलेंस्ड डाएटचं सेवन करा. ज्यामध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या सर्वांचा समावेश असेल. डिप्रेशन यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात हे पदार्थ.
- फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइजचा डेली रूटिनमध्ये समावेश करा. स्वतःला शारीरिक आणि मानसिक स्वरूपात फिट ठेवण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत आहे.
- हेल्दी बॉडी आणि माइंडसाठी अत्यंत आवश्यक आहे की, रात्री कमीत कमी 6 ते 7 तांसाची झोप घ्या.
- जर आयुष्यात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर निराश होऊ नका. पॉझिटिव्ह राहा.
- वर्षातून एकदा तरी मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडून आपलं चेकअप करा. आवश्यक नाही नेहमी आजारी पडल्यानंतरच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)