शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : मानसिक लवचिकता शिकता आली पाहिजे- डॉ. ओंकार जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 9:08 AM

जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

ठळक मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी.

''डॉक्टर , हल्ली अनय (नाव बदललं आहे)  फारच उदास झालाय, काही करायचचं नाही म्हणतो. दहावीची परीक्षाही नको म्हणतोय'' अनयची आई सांगत होती. त्याचं झालं असं की अनय सुरुवातीपासूनच हुशार, हरहुन्नरी. शाळेत सगळ्या स्पर्धा, डान्स, खेळ यात अग्रेसर असायचा. मागच्या महिन्यात तो फुटबॉल खेळताना पडला. डॉक्टरांनी दोन महिने आराम सांगितला. त्यात त्याचा बराच अभ्यास बुडाला. आता तो काहीच नको म्हणतोय. अगदी परीक्षासुद्धा नको म्हणतोय. हे सगळं ऐकल्यावर मी अनयशी बोलायचं ठरवलं.

अनयशी बोलल्यावर लक्षात आले की तो मानसिक ताणामुळे निराश झालाय. अनयने सगळ्या क्षेत्रात यशस्वी व्हायलाच हवं असा पालकांचा आग्रह. त्यामुळे वेगवेगळे क्लास, स्पर्धा आणि मग दहावीची तयारी हे सगळ सांभाळताना त्याची दमछाक झाली . हल्ली अनेक तरुण मुलांशी बोलताना हे लक्षात येते की ते सतत कोणत्या न कोणत्या मानसिक ताण तणावात असतात. आपण सगळीकडे बेस्ट असलंच पाहिजे या नादात मग सगळच चुकत जातं. नोकरी , लग्न, स्पर्धा परीक्षा, घर या सगळ्याच्या ताणाला सामोरे जाताना नैराश्य, एकटेपणा, न्यूनगंड या भावना वाढीस लागतात. त्यातूनच तरुणांच्या होणारया आत्महत्या ही एक चिंतेची बाब झाली  आहे म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने एक संपूर्ण वर्ष 'डीप्रेशन लेट्स टॉक' असे म्हणत औदासिन्य या आजारावर जनजागृती केली . 

पण या सतत वाढणाऱ्या ताणापासून स्वत:चा बचाव कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम मानसिक लवचिकता शिकायला  हवी. अनयच्या बाबतीतचं बघा ना. मला सगळ्याचं गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्यात मी यशस्वी झालोच पाहिजे हा हट्ट, दुराग्रह काय कामाचा ? सर्वप्रथम मी माणूस आहे. काही गोष्टी मला चांगल्या येतात आणि काही नाही हा आत्मस्वीकार करायला हवा. एखाद्या गोष्टीच्या यशापयशापेक्षाही ती करताना मिळणारा आनंद तेवढाच महत्वाचा. असं झाल्यास मग नोकरी, परीक्षा, प्रेम इत्यादी मध्ये अपयश आल्यास  टोकाच्या नकारात्मक भावना येणार नाहीत आणि यशाने 'हुरळून’ जायला होणार नाही.

जेव्हा तणाव जास्त असेल तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला लाजायचे कारण नाही.जसा हात मोडला तर आपण हाडांच्या डॉक्टरकडे जातो तसंचं मन दुखावलं तर त्या तज्ज्ञ माणसाकडे नको का जायला ? योग्य मानसोपचार , औषधे, व्यायाम , आहार, समुपदेशन या सगळ्यांच्या मदतीने मानसिक आजार बरे होतात. आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे जण फक्त निरोगीच नव्हे तर सुदृढ मनाकडे झेपावण्याचा संकल्प करुया. शुभेच्छा!

(लेखक शिर्डी येथील मन आरोग्य केंद्र येथे मानसोपचारतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Healthआरोग्य