आज जगभरात World NoDay हा दि Tobacco वस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. 'वर्ल्ड नो टोबॅको डे' या दिवशी तुम्हीही स्मोकिंग सोडण्याचा निर्धार केला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास गोष्टी सांगणार आहोत. खरं तर तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, हृदय विकार आणि इतर अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानाच्या संवयीपासून सुटका करणं तसं फार अवघड आहे. पण तुम्ही निश्चय केला तर सर्व शक्य आहे. धुम्रपानाच्या सवयीपासून सुटका करण्यासाठी या टिप्स करतील मदत...
सकारात्मक रहा
तुम्ही जर दिवसभर तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय मोडणे तुमच्यासाठी मोठं आव्हानच असणार आहे. अशावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणे आणि मनाची तयारी करणं आवश्यक आहे. आपण हे करु शकतो अशी गाठ मनात बांधून ठेवा. स्वत:वर विश्वास ठेवा. अशात तुमच्या मनात अनेक चुकीचे विचार येणार आणि पुन्हा तुम्ही त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल अशावेळी स्वत:ला रोखण्याची तुमची परीक्षा असेल.
प्लॅन आखून काम करा
तंबाखूची सवय मोडण्यासाठी एक दिवस ठरवा. तंबाखू खाण्याचे नुकसान, त्याने काय होतं याबाबात जे वाचायला मिळेल ते वाचा. मनाची पूर्ण तयारी करा.
स्वत:ला बिझी ठेवा
तंबाखूची सवय मोडायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वत:ला कामात व्यस्त करुन घेणे. लोकांसोबत वेळ घालवा, सतत पाणी प्यायला हवे, टीव्ही बघा. हे सगळं करताना काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण याने तुमचं मन डालव्हर्ट होईल आणि तुमची सवय मोडण्यास मदत होईल.
या गोष्टींपासूनही रहा दूर
त्या गोष्टींपासूनही दूर रहा ज्यामुळे तंबाखूचं सेवन करण्यास प्रोत्साहन मिळतं. कॉफी ब्रेक किंवा ड्राईव्ह करताना याची खास काळजी घ्या. घरातून तंबाखू बाहेर फेकून द्या. जे तंबाखू खाणारे लोक आहे त्यांच्यापासून दूर रहा.
हे ट्राय करा
तंबाखूचं व्यसन मोडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन दुसऱ्या गोष्टीत लावावं लागेल. तुम्हाल जर तंबाखू खाण्याची तलब आली तर च्यूईंगम, ओवा खावा. याने तुम्हाला आलेली तबल त्या वेळेपुरती मारली जाते.
धुम्रपान सोडण्यासाठी हे पदार्थ ठरतात फायदेशीर :
आलं
आल्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तुमच्या रेस्पिरेट्री सिस्टमवर (Respiratory system) परिणाम करतो. हे धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी मदत करतात. आलं शरीराला उष्णता देण्याचं काम करत. हे शरीरातील विषारी घटक घामावाटे शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत करतात. आपल्या शरीरातून सिगरेटचे हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आलं मदत करतं. तसेच त्यामुळे तुम्हाला लागलेली सिगरेटची सवय सोडवण्यासही मदत होईल.
लाल मिरची
लाल मिरची सिगरेटमध्ये आढळून येणारे तंबाखू आणि इतर केमिकल्सला रेस्पिरेट्री सिस्टमपर्यंत पोहचवण्यापासून रोखतं. सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं. लाल मिरचीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात. याचं तिखट आणि तीव्र चव धुम्रपान करण्याची इच्छा रोखण्यासाठी मदत करते.
अश्वगंधा
अश्वगंधा सिगरेट पिण्याची इच्छा कमी करण्यासाठी मदत करतं. हे अड्रेनल ग्लँडसाठी एका टॉनिकप्रमाणे काम करतं आणि रक्तप्रवाहामध्ये कोर्टिसोलचा स्तर निर्माण करण्यासाठी मदत करतात. अश्वगंधा शारीरिक आमि भावनिक तणावासोबत शरीरात होणाऱ्या अन्य आजारांच्या लक्षणांना संतुलित करतात. हे हानिकारक विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. तसेच फुफ्फुसांमधील विषारी पदार्थ स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दूधामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्र करून प्यायल्याने धुम्रपान करण्याची इच्छा कमी होते.
पेपरमिंट
पेपरमिंटचा वापर करून तुम्ही अगदी सहज सिगरेट सोडवू शकता. कारण यामध्ये निकोटीनच्या अति सेवनाने झालेल्या पोटाच्या समस्या दूर करण्याचं गुणधर्म असतात. धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या खाणं उत्तम उपाय आहे. याचा गंध आणि चव धुम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी मदत करते. पेपरमिंटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीफंगल गुणधर्म असतात. जे धुम्रपान करण्याची इच्छा रोखण्यासाठी मदत करतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.