शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

World No Tobacco Day 2021: निकोटीन चघळा, धुम्रपानापासून मुक्ती मिळवा; जाणून घ्या प्रभावी थेरपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:20 PM

Say no to Smoking: एनआरटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या  निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीला एफडीएने मान्यता दिली असून तंबाखू सोडण्यासाठी केला जाणारा हा सुरुवातीचा उपचार आहे.  धूम्रपान यशस्वीपणे सोडता यावे यासाठी मदत करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे.

How to quit Smoking: धूम्रपान (Smoking) सोडून देण्याची इच्छा कितीही प्रबळ असली आणि मानसिक ताकद कितीही जास्त असली तरी प्रत्यक्षात ते करणे बऱ्याचदा कठीण होऊन बसते. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे - २ इंडिया (जीएटीएस - २) नुसार सध्या भारतातील एकूण लोकसंख्येपैकी २८.६% लोक धूम्रपान करतात.  विविध जागरूकता मोहिमांमुळे या आकडेवारीमध्ये २०११ च्या तुलनेत एकंदरीत ६% घट जरी झालेली असली तरी अद्याप देखील ही समस्या अतिशय गंभीर असून या क्षेत्रात बरेच काम करणे गरजेचे आहे. धुम्रपानामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची यादी बरीच मोठी आहे. तंबाखूचा वापर आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, पोषण कमतरता, डोके व मान, फुफ्फुसे, पोट, किडनी आणि जठर या अवयवांना होणारे कर्करोग यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.  या अनेक हानिकारक दुष्परिणामांविषयी माहिती असून देखील लोक धूम्रपान करणे सोडत नाहीत कारण निकोटीन सोडल्याने निर्माण होणारी लक्षणे त्रास देऊ लागतात, झोप न लागणे, अस्वस्थता, छातीत धडधड होणे, कोणत्याच गोष्टीत लक्ष न लागणे यासारखी ही लक्षणे सहन करणे खूप कठीण असते. (How nicotine replacement therapy can help in quitting smoking)

एनआरटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या  निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीला एफडीएने मान्यता दिली असून तंबाखू सोडण्यासाठी केला जाणारा हा सुरुवातीचा उपचार आहे.  धूम्रपान यशस्वीपणे सोडता यावे यासाठी मदत करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. यंदाच्या जागतिक तंबाखू निषेध दिनी 'सोडून देण्यासाठी वचनबद्ध राहा' या विचारावर भर देण्यात येत आहे, या निमित्ताने मुंबईतील द लंग केयर अँड स्लीप केयरचे संचालक, पल्मनोलॉजिस्ट डॉ. प्रशांत छजड यांनी एनआरटीसाठीचे विविध पर्याय आणि ते कसे काम करतात याबाबत बहुमूल्य माहिती दिली आहे. 

धूम्रपान सोडून देण्यात मदत करण्यात फार्माकोथेरपी (एनआरटी) आणि नॉन-फार्माकोथेरपी महत्त्वाच्या आहेत.  नॉन-फार्माकोथेरपीमध्ये रुग्णाला माहिती देऊन जागरूक करणे, सल्ला देणे, वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी थेरपी, स्वयं-सहायता सामग्री आणि सल्ला यांचा समावेश असतो तर फार्माकोलॉजिकल थेरपीमध्ये निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (एनआरटी), वॅरेनीक्लाईन आणि ब्युप्रोपियन यांचा समावेश होतो. 

निकोटीन ओरल च्युईंग गम्स शरीराला निकोटीन पुरवतात पण त्याचे प्रमाण कमी असते. निकोटीन ओरल च्युईंग गम्सचे डोसेस किती घेतले आहेत त्यानुसार त्या व्यक्तीला धूम्रपान सोडण्यासाठी १२ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. हे च्युईंग गम्स मर्यादित प्रमाणात निकोटीन सोडत असल्याने एनआरटीसाठी त्यांचा वापर केल्याने त्या व्यक्तीला धूम्रपान/तंबाखू सोडण्यास अपेक्षेपेक्षा जास्त काळ लागू शकतो.  या च्युईंग गम्सचा वापर दीर्घकाळ करत राहिल्याने जबडे दुखू लागतात आणि त्यामुळे त्यांचा वापर करणे त्रासदायक ठरू शकते. 

निकोटीन लॉझेंजेस असतात ज्या एनआरटीमध्ये मदत करतात.  लॉझेंजेसमध्ये तोंडात सोडले जाणारे निकोटीन हे रक्तप्रवाहात प्रवेश करते आणि धुम्रपानातून जे निकोटीन मिळाले असते त्याची जागा घेते, यामुळे धूम्रपान न केल्याने निर्माण होणाऱ्या लक्षणांची तीव्रता कमी होते.  लॉझेंजेसमधून इतर ओरल एनआरटी पर्यायांपेक्षा २५% जास्त निकोटीन सोडले जाते.  तसेच लॉझेंजेस अधिक वेगाने निकोटीन सोडतात यामुळे धूम्रपान सोडण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची संभावना निर्माण होते.  अशाप्रकारे या पद्धतीने धूम्रपान सोडण्याची प्रक्रिया ही कमी आव्हानात्मक असते कारण यामध्ये अचानक धूम्रपान करावेसे वाटण्याच्या भावनेतून त्वरित सुटका होते.  लॉझेंजेस ही धूम्रपान सोडण्यात प्रभावी आणि सर्वोत्तम मदत असल्याचे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे.  एनआरटीचा हा पर्याय शरीराला निकोटीन अवलंबून राहण्याचे हळूहळू कमी करण्यात मदत करतो, त्यामुळे धूम्रपान सोडण्यात यश मिळण्याची शक्यता बळावत जाते.  लॉझेंजेस १५ ते २० मिनिटे हळूहळू शोषून घ्यायच्या असतात.  

आणखी एक पर्याय म्हणजे द्रव स्वरूपातील निकोटीन जे खाण्यात मिसळून घेतले जाऊ शकते.  या द्रवाचे काही थेंब कोणत्याही खाण्यामध्ये सहजपणे मिसळता येतात व सुचवण्यात आलेल्या डोसेजनुसार घेता येतात.  धूम्रपान सोडून देण्यात लोकांची मदत करण्यासाठी एनआरटीमध्ये हा प्रभावी पर्याय मानला जातो.  या पद्धतीमध्ये निकोटीनच्या चवीविषयी नावड निर्माण करून निकोटीनचे सेवन करावेसे वाटण्याचे प्रमाण कमी होते, अशाप्रकारे तंबाखू सोडून देण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. 

निकोटीन स्ट्रिप्स देखील उपलब्ध आहेत ज्या तोंडावाटे घ्यायच्या असतात, त्या तोंडात निकोटीन सोडतात.  परंतु या स्ट्रिप्समधून सोडले जाणारे निकोटीन खूप कमी प्रमाणात/डोसेजमध्ये असते आणि या स्ट्रिप्स दर दिवशी मर्यादित संख्येतच घेतल्या जाऊ शकतात.  काही वेळा निकोटीन सेवनाची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते पण जर सुचवण्यात आलेल्या स्ट्रिप्स आधीच घेऊन झालेल्या असतील तर धूम्रपान सोडण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीचा ताण आणि त्रास अधिक जास्त वाढू देखील शकतो.

निकोटीन पॅचेस हा देखील एनआरटीसाठी खूप जास्त प्रमाणात वापरला जाणारा पर्याय आहे.  हे पॅचेस ५ ते १० तासात रक्तप्रवाहामध्ये सर्वात जास्त निकोटीन सोडण्याची पातळी गाठतात.  यामध्ये वापर करण्याची योग्य पद्धत वापरली गेली पाहिजे.  पॅचवरील ऍडहेसिव्हमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो आणि हे काही वेळा पडू देखील शकते.  त्यामुळे शरीराच्या पटकन दिसून येईल अशा भागावर ते चिटकवणे योग्य ठरते. 

धूम्रपान सोडणे हे सोपे निश्चितच नाही पण  सल्ला, माहिती, सकारात्मक पाठबळ आणि योग्य व प्रभावी एनआरटी यामुळे धूम्रपान सोडण्यासाठीच्या प्रयत्नांचा प्रवास अधिक सोपा केला जाऊ शकतो.  वर नमूद करण्यात आलेले एनआरटीचे पर्याय सिगारेट्स आणि इतर तंबाखू उत्पादनांचे व्यसन कमी करण्यात मदत करू शकतात.  एनआरटीच्या मिश्रणामध्ये निकोटीन पॅच (दीर्घकाळपर्यंत काम करत राहणारा एनआरटीचा प्रकार) आणि रुग्णाच्या निवडीनुसार एखादा कमी वेळ काम करू शकणारा निकोटीन गम किंवा लॉझेंजेस यासारखा एनआरटीचा प्रकार यांचा समावेश होतो.  या सर्व प्रकारांच्या वापरातील आव्हाने कोणकोणती आहेत याबाबत आपल्या थेरपिस्टकडून जाणून घ्यावे आणि त्यांनी सूचना केल्यानुसारच डोसेज घ्यावेत.  एनआरटीचा प्रभाव किती होतो आहे हे थेरपिस्ट तपासतात आणि संपूर्ण कोर्स कालावधीत निकोटीनचे प्रमाण हळूहळू कमी करत जातात, यामुळे शरीराला निकोटीनशिवाय राहणे शक्य होत जाते.

टॅग्स :Smokingधूम्रपानTobacco Banतंबाखू बंदी