शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

World No Tobacco Day : भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे....!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 8:53 AM

३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त विशेष लेख..!

-Ravindra Moreएक मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पूर्णत: पवित्र, व्यसनांपासून अलिप्त तसेच आपल्या बालपणाच्या मस्तीत जगत असतो. मात्र जेव्हा तो मोठा होतो, दुनियादारीला समजू लागतो, त्याच्या भोवताली काय सुरु आहे हे सर्व जाणतो, तेव्हा तो का समाजात पसरणाऱ्या वाईट गोष्टींचा स्वीकार करु लागतो आणि येथूनच तो आपल्या आयुष्याचा असा मार्ग निवडतो जो त्याला कायमचा आयुष्यातून उठवितो. मरणास काही तरी कारण असतं, मग ते तंबाखूचे किंवा दारुचे व्यसनही असू शकतं. तंबाखूमुळे जगामध्ये दर सहा सेकंदाला एक व्यक्ती दगावतो. भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक व्यसनींचा मृत्यू कॅन्सर किंवा अल्पवयातच ह्रदयविकाराने होतो. शासनास तंबाखूमुळे होणाऱ्या होणाऱ्या व्याधींवरील खर्चाची रक्कम त्यावरील मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ८ ते १० पट अधिक आहे. ७० लक्ष भारतीयांच्या उपजिविकेचा प्रश्न इतका भयंकर आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर खडगी भरणाऱ्याच्या पोटावर पाय देणेच शासनाला अवघड होऊन बसल्याचे दिसते. मग वर्षाला १० लक्ष लोकांचा जीव ह्या व्यसनामुळे जातोय ह्याच्या गांभिर्याचा केवळ आव आणला जातोय.अप्रत्यक्षपणे टोबॅको इंडस्ट्री लॉबिंग करुन तंबाखूबंदी होऊच देत नाही. त्यांच्या ताकदीला शह देण्यासाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना तंबाखू विरोधी मोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यापासून ते थेट मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयातील सर्व वर्गांना ह्या संघटनांनी वेठीस धरले व तंबाखू विरोधी कायद्यांची प्रखरतेने अंमलबजावणी करण्यास भाग सुद्धा पाडले. गुटख्यापाठोपाठ सरसकट तंबाखूबंदीकडे सातत्याने वाटचाल सुरु आहे. त्याचेच फलीत म्हणून मागील दोन वर्षापासून या तंबाखू उत्पादनाचा व त्यामुळे मिळणाऱ्या कराचा ढासळता आलेख दृष्टिपथास येत आहे. त्याच बरोबर तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या मुख कर्करोगाच्या प्रमाणातही मागील दोन वर्षात घट नोंदवली गेली असल्याचे राष्ट्रीय कुटुंब कल्याण आढाव्यातून निदर्शनास आले आहे. (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-४)महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर ग्रुपचे प्रमुख टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत प्रो. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी तंबाखू उच्चाटनाचा जणू विडाच उचलला आहे. तसेच तंबाखूवर पुर्णपणे जोपर्यंत बंदी येत नाही, तोपर्यंत सरकारच्या तंबाखूविषयी धोरणाला लक्ष करुन जनसामान्यांपर्यंत पोहचून तंबाखूची मागणीच संपेपर्यंत शांत बसायचे नाही हेच ठरविले आह. त्यांच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हास्तरावर किमान एकतरी वॉरिअर सक्रिय आहे. Also Read : ​​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक