शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

World Organ Donation Day 2018 : अवयवदानाबाबत समाजात असलेले समज, गैरसमज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 3:27 PM

दान करणं हे सर्वात मोठं काम असतं असं आपण नेहमी ऐकतो. आपल्या धार्मिक ग्रंथांमधूनही आपल्याला दानशूरपणाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे कर्ण.

दान करणं हे सर्वात मोठं काम असतं असं आपण नेहमी ऐकतो. आपल्या धार्मिक ग्रंथांमधूनही आपल्याला दानशूरपणाची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाला सर्वश्रेष्ट दाता असं म्हटलं जातं. असचं एक दान म्हणजे अवयव दान. 13 ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक अवयवदान दिवस (World Organ Donation Day) म्हणून ओळखला जातो. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्यामुळे एखाद्या माणसाला जीवनदान मिळतं. पण या दानाबाबत समाजात अनेक समज आणि गैरसमज  पसरलेले आहेत. आज अवयव दिनाच्यानिमित्ताने जाणून घेऊयात या गैरसमजांमागील मागील सत्य काय आहे ते...

- बऱ्याच लोकांना असं वाटतं की, ते अवयव दान करणार आहेत असं हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना समजलं तर ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. कारण प्रत्येक डॉक्टर रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ते उगाच कोणालाही मरणाच्या दारी पाठवत नाहीत. 

- आपल्या शरीराला अनेक व्याधी असतात. असे असताना अवयवदान करू शकत नाही असा प्रत्येकाचा समज असतो. पण हा समज अत्यंत चुकीचा असून प्रत्येकजण अवयदान करू शकतात. 

- वृद्ध माणसांना अवयव दान करता येत नाही असं अनेक जणांना वाटतं पण हा समज अत्यंत चुकीचा आहे. अवयव दान करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. फक्त अवयवांचं सुदृढ असणं गरजेचं असतं. 

- अवयव दान करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. अनेक जणांचा असा समज आहे की, अवयव दान करणासाठी फार मोठा खर्च करावा लागतो. 

- अवयवदान केल्यानंतर कोणीही तुमचा कोणताही अवयव विकू शकत नाही. असे कोणी करत असेल तर कायद्याने त्यांना कडक शिक्षा होऊ शकते.

- जर एखादी व्यक्ती कोमामध्ये असेल तर ती व्यक्ती अवयवदान करू शकत नाही असा अनेक जणांचा समज असतो. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अवयवदान करणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त संख्या ब्रेन डेड असणाऱ्या लोकांची आहे. त्यामुळे जर ब्रेन डेड झालेली लोकं अवयव दान करू शकतात तर कोमात गेलेली लोकंही नक्कीच अवयव दान करू शकतात. 

- अवयवदान करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचं सेक्शुअल ओरिंअंट नाही तर त्या व्यक्तिच्या शरीराचं सुदृढ असणं गरजेचं असतं. त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटी असणारी लोकंही अवयव दान करू शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सOrgan donationअवयव दानHealthआरोग्य