जगभर दोन प्रकारचे व्हायरस पसरत आहेत. एक मंकीपॉक्स आणि दुसरा ओरोपोच. आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार होत असताना, ओरोपोच अमेरिकेसह इतर देशांमध्ये पसरत आहे. जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिला सर्वात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण तिला या व्हायरसचा सर्वात जास्त धोका असतो आणि त्याचप्रमाणे तिच्या नवजात बाळालाही याचा धोका आहे. ओरोपोच व्हायरसमुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या व्हायरसला स्लॉथ फिव्हर असंही म्हणतात.
गेल्या वर्षी, हा व्हायरस अमेरिकेच्या ॲमेझॉनच्या आसपासच्या भागात पसरला होता. दक्षिण अमेरिकेत १ ऑगस्टपर्यंत, या व्हायरसची ८००० प्रकरणं नोंदवली गेली आहेत. युरोपातही हा आजार झपाट्याने पसरत आहे. मात्र, त्याचा प्रभाव भारतात अद्याप दिसून आलेला नाही. अनेक रिसर्च करूनही या व्हायरसबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितलं गेलेले नाही. त्यामुळे तो एका गूढ व्हायरससारखा पसरत आहे. त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा पसरतो आणि टाळण्याचे उपाय काय आहेत हे जाणून घेऊया...
ओरोपोच हा एक व्हायरस आहे, जो मिज किंवा डास चावल्यानंतर पसरतो. हा एक प्रकारचा लहान कीटक आहे. हे कीटक सामान्यतः मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. चक्कर येणं, डोकेदुखी, स्नायूदुखी, मानदुखी आणि मानसिक आरोग्यावर परिणाम अशी लक्षणं दिसू लागतात. या व्हायरसमुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते.
या व्हायरसवर उपचार करण्यासाठी कोणताही अँटीव्हायरस नाही. एसिटामिनोफेन प्रमाणेच या व्हायरसची लक्षणं कमी करण्यास मदत करू शकतात. एस्पिरिन किंवा इबुप्रोफेनसारख्या औषधांचा वापर हा या व्हायरससाठी करू नये. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, तुम्ही कोणतंही कीटकनाशक वापरू शकता, ज्यामध्ये DEET किंवा इतर कोणतेही घटक आहेत, जेणेकरून डास आणि कीटक घरांपासून दूर राहतील. घरात किंवा परिसरात साचलेलं पाणी ताबडतोब काढून टाका, कारण येथे डासांची पैदास होऊ शकते.