कदाचित हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरचं असं घडलं आहे. 74 वर्षांच्या एका महिलेला आपल्या लग्नाच्या 54 वर्षांनी मातृत्व लाभलं आहे. या महिलेने चक्क जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, जास्त वयामध्ये आई झाल्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या घटनेचं वृत्त वाचू अनेक लोक हैराण झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
आई झालेल्या महिलेचे नाव एरामती मंगयाम्मा (Erramatti Mangamma) आहे आणि तिच्या पितचं नाव राजा राव असं आहे. एरामती आणि राजाराव गुंटूरमधील नेलापारथीपाडु भागात राहत असून त्यांचं लग्न 22 मार्च 1962 मध्ये झालं होतं.
प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यांप्रमाणेच एरामती मंगयाम्मा आणि राजाराव यांना बाळ पाहिजे होतं. पण अनेक प्रयत्नांनतरही त्यांच्या पदरी निराशाच येत होती. यामुळे आई-बाबा होण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 55 वर्षांच्या एका महिलेला आईवीएफ पद्धतीमुळे मातृत्व लाभलं होतं. या घटनेमुळे मंगयाम्मा यांचं आई होण्याचं स्वप्न पुर्ण झालं.
मंगयाम्मा आपले पति राजाराव यांच्यासोबत जवळच असलेल्या अहिल्या नर्सिंग होममध्ये गेल्या आणि तेथे त्यांनी आयव्हिएफ ट्रिटमेंट घेण्यास सुरुवात केली. गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आलं. 5 सप्टेंबरल सकाळी 10 वाजून तीस मिनिटांनी डॉक्टरांनी सिजेरियन ऑपरेशन केलं आणि मंगयाम्मा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. याआधी हा रेकॉर्ड पंजाबमधील दलजिंदर कौर यांच्या नावे होता. ज्यांनी वयाच्या 72व्या वर्षी बाळाला जन्म दिला होता.