झोपणं कोणाला आवडतं नाही? अनेकांसाठी तर झोपणं म्हणजे जणू काही सुखचं. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनापासून शांत झोप मिळणं म्हणजे, दुर्मिळचं. झोपल्यामुळे दिवसभराचा थकवाच दूर होत नाही तर मन आणि डोकंही शांत राहण्यास मदत होते. चांगली झोप झाल्याने आपल्याला मानसिक रूपाने शांतता मिळते. आपलं मन आणि मूड फ्रेश राहतो. अर्थातच त्यामुळे आपलं कामही चांगलं होतं. अनेकजण नेहमीच चांगली झोप लागत नसल्याने त्रासलेले असतात. जर तुम्हालाही झोप येत नसेल तर याला जबाबदारही तुम्हीच आहात.
साधारणतः असं मानलं जातं की, फक्त एक्सरसाइज किंवा जॉगिंग केल्याने वजन आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होत. परंतु तुम्हाला असं कोणी सांगितलं की, वजन कमी करायचं असेल तर मस्तपैकी एक झोप काढ, तर आश्चर्यच वाटेल ना?
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, झोपल्यामुळे वाढलेलं पोट कमी करण्यासाठी मदत होते. आज वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही स्लीपिंग टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही बेली फॅट कमी करू शकता.
1. कधीही उपाशी पोटी झोपू नका. नेहमी लोकं विचार करतात की, रात्री काही खाल्लं नाही तर कमीत कमी वजन कमी होण्यास मदत होइलच. परंतु असं अजिबात नाही. उपाशी पोटी झोपल्याने तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. त्यामुळे तुमचं शरीर रिलॅक्स होणार नाही. झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा वाढतो.
2. झोपण्याची वेळ आणि जेवणाच्या वेळामध्ये काही अंतर ठेवा. म्हणजेच, जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते आणि अस्वस्थ वाटण्याची भिती असते. त्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे रात्रीचा आहार हलका घ्या आणि झोपण्यापूर्वी 1 ते 2 तास अगोदर जेवण करा.
3. झोपण्यापूर्वी थोडंसं पनीर खा. पनीरमध्ये लीन प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. तसेच यामध्ये एमीनो अॅसिड ट्रप्टोफॅन असतं. हे सेरोटॉनिनची लेवल वाढवून चांगली झोप येण्यासाठी मदत करतं. जर सेरोटॉनिनच्या लेव्हलमध्ये कमतरता दिसली तर यामुळे झोप न येण्याचा आजार म्हणजेच, इन्सोमनिया होऊ शकतो.
4. दररोज रात्री एक कप हर्बल चहा प्यायल्याने फायदा होतो. चॅमोमाइल चहा, आल्याचा चहा आणि पुदिन्याचा चहा तुम्हाला फक्त रिलॅक्सच करणार नाही तर वाढलेलं पोट कमी करण्यासाठीही मदत करेल.