जगभरात दरवर्षी २४ मार्चला वर्ल्ड ट्यूबरक्लोसिस डे (World Tuberculosis Day 2022) म्हणजे टीबी दिवस पाळला जातो. हा पाळण्यामागचं कारण टीबी या आजाराबाबत लोकांना जागरूक करणं हे आङे. जगभरात कोट्यावधी लोकांना टीबी हा आजार आहे. हे एक गंभीर बॅक्टेरिअल संक्रमण आहे जे फुप्फुसावर प्रभाव टाकतं. हळूहळू याचा प्रभाव मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या अवयवांवरही होऊ शकतो. हा आजार मायकोबॅक्टीरिअम ट्यूबरक्लोसिस नावाच्या एका बॅक्टेरियामुळे होतो.
टीबीची लक्षणं
- टीबीच्या सर्वात सामान्य लक्षणामध्ये खोकला हे एक आहे. हा खोकला बरेच दिवस राहतो. २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त हा खोकला राहतो. टीबी होणारा खोकला हा कोरडा नसतो यात लाळ आणि कफसोबत निघतो.
- खोकल्यानंतर रक्त येणे
- छातीत दुखणं किंवा श्वास घेताना दुखणं
- वेगाने वजन कमी होणे
- फार जास्त थकवा
- ताप
- रात्री झोपेत खूप घाम येणं
- थंडी वाजणे
- भूक न लागणे
काय असतो टीबी?
टीबीने संक्रमित व्यक्ती जेव्हा खोकतो, हसतो किंवा शिंकतो तेव्हा मायकोबॅक्टेरिअम ट्यूबरक्लोसिस बॅक्टेरिा हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जातो. ज्याने टीबी होतो. एक्सपर्ट्सनुसार, बॅक्टेरिया फार सहजपणे पसरतात, तरीही टीबी होणं इतकं सहज नाही. सामान्यपणे यात फुप्फुसं प्रभावित होता. पण त्याशिवाय यात लिम्फ ग्रंथी, पोट, पाठ, सांधे आणि शरीराचे इतरही काही अवयव प्रभावित होतात.
कोणत्या लोकांना जास्त धोका?
जर तुम्ही एखाद्या मित्राला किंवा सहकाऱ्याला अॅक्टिव टीबी असेल तर तुम्ही संक्रमित होण्याची पूर्ण शक्यता असते. रशिया, आफ्रिका, पूर्व यूरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनसारख्या क्षेत्रात राहणारे किंवा प्रवास केलेल्या लोकांना याची शक्यता जास्त असते. कारण इथे टीबी अधिक आहे. HIV संक्रमित लोक, बेघर किंवा तुरूंगात राहणारे कैदी किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्स घेणारे लोक यांना टीबी होण्याचा धोका अधिक असतो. टीबी रूग्णांवर उपचार करणारे हेल्थ वर्करही याचे शिकार होऊ शकतात. स्मोकिंग करणाऱ्या लोकांना टीबी आजार होण्याचा धोका जास्त असतो.
काय आहेत उपचार?
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, टीबीची लक्षणं दिसली तर लगेच यावर उपचार सुरू करावे. जे लोक याकडे दुर्लक्ष करतात त्यांची स्थिती आणखी गंभीर होत जाते. याची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. सामान्यपणे ६ महिन्यांच्या कोर्सनंतर यावर उपचार केले जाऊ शकतात.