शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

​World Tuberculosis Day Special : भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तींना नव्याने क्षयरोगाची लागण !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 9:04 AM

भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण होते. दर तीन मिनिटाला दोघांचा क्षयरोगाच्या आजाराने मृत्यू होते. तरुणवर्गा मध्ये क्षयरोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होते व त्यात एचआयव्ही मुळे आणखी भर पडत आहे.

-Ravindra Moreआज दि.२४ मार्च २०१७ हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज भारत देश हा जागतिकीकरणाच्या महत्वाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करीत असतांना काही अशा समस्या आहेत की ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे.सध्या ग्राम पातळीवरून तर जागतिक पातळीवर क्षयरोग व एचआयव्ही/एड्स सारख्या आजाराचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. मात्र शासनाने या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या आहेत त्या मध्ये प्रामुख्याने क्षयरोगासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम खूप महत्वाचा ठरला आहे. या कार्यक्रमातील सुविधा व सेवा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रसारमाध्यमान मार्फत वर्तमान पत्रे, मासिके, पाक्षिके, साप्ताहिक अशा अनेक माध्यमातून जनजागृती केली जाते.क्षयरोग हा अतिप्राचिन रोग असून इ.स ५००० हजार वर्षा पूर्वीच्या वैदिक काळातही त्याचे अस्तित्व होते. तेव्हा क्षयरोग ही भारतातातील एक महत्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. हा रोग हवे मार्फत पसरत असल्याने भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण होते.दर तीन मिनिटाला दोघांचा क्षयरोगाच्या आजाराने मृत्यू होते. तरुणवर्गा मध्ये क्षयरोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होते व त्यात एचआयव्ही मुळे आणखी भर पडत आहे. पूर्वीच्या काळी या रोगाला "राजयक्ष्म" असे ओळखले जायचे. क्षयरोग हा प्रामुख्याने कमावत्या वर्गामध्ये होतो त्यामुळे समाजातील अर्थ व्यवस्थेवर दुष्परिणाम होतो. अश्या संसर्गजन्य क्षयरोगा विषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे... कारण आजार होण्या पेक्षा तो आजार होऊच नये म्हणून या आजाराला जर रोकायचे असेल तर जनजागृती हा फार महत्वाचा भाग आहे. क्षयरोग हा मायकोबक्टेरीयम ट्यूबरक्युलोसीस बेसिला या जिवाणूमुळे होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.क्षयरोग हा संसर्गजन्य आहे तो दोन प्रकारच्या जीवाणूमुळे होतो एक मायकोबक्टेरीयम बोविस,आणि दुसरा मायकोबक्टेरीयम ट्युबरक्युलोसीस बहुताश वेळा मायक्रोबक्टेरीयम ट्युबरक्युलोसीस मुळेच मनुष्याचा मृत्यू असे प्रमाणित केले आहे.दोन्हीही संसर्गजन्य रोगात निदान हे जवळपास सारखेच असते.क्षयरोगा झाल्यावर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो(नखे व केस)वगळता तथापि फुफ्फुसालाही संसर्ग झालेला असतो.पूर्वी लागण झालेल्या रुग्णांना मोकळ्या हवे मध्ये ठेवणे हाच सुरक्षित उपचार असायचा.मायक्रोबक्टेरीयम बोविस-हा क्षयरोग प्रामुख्याने पशुधनातील दुधापासून येतो.साधारणता दुधाला पाश्चराईज केल्यानंतर त्यात असलेले सूक्ष्मजंतू-Bacteria नष्ट होतात व ते दुध जे पितात त्यांना हा आजार होण्याची शक्यता फार कमी असते.पण जर एखाद्या गाय आणि म्हशीला क्षयरोगाचा संसर्ग झाला असेल आणि ते दुध चांगले गरम केल्यानंतर सुद्धा ज्यांच्या पिण्यात आले तर असा व्यक्ती सुद्धा या रोगाच्या विळख्यात अडकू शकतात,गर्दीच्या ठिकाणी हा रोग जास्त पसरतो,हा खोकला आणि शिंकणे यातूनच पसरू शकतो.विकसित देशात हा रोग हळूहळू कमी होत आहे. पण एचआयव्ही या आजारामुळे पुन्हा वाढतो आहे.लेटेंट टी.बी ज्यांच्या शरीरात क्षयरोगाच्या किटाणूची संख्या कमी असेल तर त्याना हा आजार जाणवत नाही.रोग प्रतिकारक क्षमता असल्याने त्याची प्रकृती बिघडत नाही.यांना लेटेट किवा इनएक्टीव्ह टी.बी संसर्ग(एटीबीआय)चे रुग्ण मानले जाते. लेटेट टी.बी संसर्गाचे निदान तपासणी केल्यानंतरच कळते अन्यथा नाही.अशा प्रकारच्या क्षयरोग्या पासून संसर्ग पसरत नाही.बहुतांश लोकांना लेटेट टी.बी असतो त्यांना एक्टीव्ह टी.बी होत नाही आणि ते आजारी ही नसतात यात फक्त ५ ते १०% रुग्ण पूर्ण पणे क्षयरोगाने ग्रस्त असतात त्यांना उपचाराची गरज असते.क्षयरोग वाढतो कसाट्यूबरक्युलोसीस बॉसिलस एकदा श्वासातून आत गेल्या नंतर फुफ्फुसात ठाण मांडतो.रक्षातंत्र त्यांना एकच जागी बांधून ठेवते त्यांना पांढऱ्यापेशी मदत करतात अनेक वेळा संसर्ग झालेल्या पांढऱ्यापेशी रक्तपेशी लिम्फ नोड्समधे या जंतुना जाऊ देतात आणि त्याचा फैलाव संपूर्ण शरीरात होतो.एखाद्या अवयवात याचा बेधडक शिरकाव झाल्यास संपूर्ण शरीर त्याच्या विळख्यात येते.पल्मनरी क्षयरोग फुफ्फुसाच्या वरच्या भागात असतो. क्षयरोगाची लक्षणे, निदान व उपचार पद्धती.... क्षयरोगाची लक्षणे.. १)दोन आठवडय़ांहून अधिक काळ असणारा खोकला,  २)बेडकायुक्त खोकला ३) हलकासा परंतु रात्री येणारा ताप, ४)घटणारे वजन, ५)भूक कमी होणे, ६)बेडक्यातून रक्त पडणे, ७)थकवा, ८)छातीत दुखणे  ९)रात्री येणारा घाम, १०)मानेला गाठी येणे, लिम्फ नोड अश्या वेळी रुग्णांच्या छातीत खूप मोठ्या प्रमाणात कफ साचतो तसेच औषधे किंवा रोगप्रतीबंधकाचा परिणाम होत नाही.काही काळानंतर कफमधून रक्त ही पडते.क्षयरोग आजाराचे प्रकार---फुफ्फुसाचा क्षयरोगदूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह), अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा१) ग्रंथीचा क्षय्ररोग (लिम्फ नोड) २) हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग ३) जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट) ४) मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम) ५) आतडयाचा क्षयरोग विविध अवयवाला झालेल्या जंतू संसर्गामुळे दिसून येणारी लक्षणे व त्याचे वर्गीकरण1) प्लुरल इफ्युजन-- फुफ्फुसाच्या क्षयरोगात कधी कधी संसर्ग झालेल्या फुफ्फुसाच्या आवरणात दोन थरात फ्लुइड जमा होतो.याला प्लुरल इफ्युजन असे म्हणतात. याचे प्रमाण वाढल्यास रुग्णाला श्वास घेणे अवघड जाते. या सर्व क्रियामुळे याच्या क्रियामुळे याच्या सेन्ट्रल नर्व्हस सिस्टिमवर ताण पडल्याने(प्रहार) होण्याने मेंदूज्वर किंवा ट्युमर होऊ शकतो यामुळे रुग्णाला ताप येणे,डोकी दुखी,उलटी,सुस्ती किंवा लकाव्याचा त्रास होऊ शकतो.२) पेरीकार्डीयल इफ्युजन– हृदयाच्या आवरणाच्या क्षयरोगाच्या संसर्गाने फुफ्फुसात जो फ्लुइड जमा होते त्याला पेरीकार्डीयल इफ्युजन असे म्हणतात.यात रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि सूजही येते.३)असायटीस- आतड्यांना संसर्ग होऊन पोटात पाणी साचते. तसेच हाडाचा क्षयरोग झाल्यास हाडे कमकुवत होतात,आणि किडनी या अवयवाचा क्षयरोग झाल्यास रुग्णास ताप व लघवी वाटे रक्त जाते ही लक्षने दिसून येतात.                                                        क्षयरोग निदान करण्याच्या विविध पद्धती फुफ्फुसाच्या क्षयरोग झाल्यास रुग्णाची १) थुंकी तपासणे,-सुष्मदर्शक यंत्राद्वारे.२) एक्सरे-छातीचा फोटो. ३) सिटी स्कॅन द्वारे फुफ्फुसाचा व छातीच्या आत मध्ये लिफनोड च्या क्षयरोगाचे निदान होते.     ४) आय.जि.आर.ए ची चाचणी--(इंटरफेरोन गामा रिलीज एसे) या द्वारे रुग्णाच्या रक्ताची तपासणी केली जाते.रोगीच्या शरीरातील रोग प्रतिबंधक क्षमता ही टी.बी किटाणूशी मिळून काही खास मोलीक्युल सायटोकिन्स तयार करतात तेव्हा या तपासणीत दिसून येतात.यात रक्ताच्या नमुन्यांना एका विशेष रसायनात मिसळून निदान करता येते.या तपासणीत एकदाच रुग्णाच्या तपासण्या केल्या जातात व एका दिवसात अहवाल प्राप्त होतो.परंतु जो रुग्ण एचआयव्ही बाधित असतो त्यात ही तपासणी मिळतीजुळती आहे.फ्लुरोसंट मायक्रोस्कोपी--- यात हेलोजन च्या साह्याने ची सुष्म bacteria तपासणी केली जाते.फुफ्फुसाचा क्षयरोग व संशियित रोगी कोणाला म्हणावे--- अ) सर्वसाधारण व्यक्ती– ज्या व्यक्तीला दोन आठवड्या पेक्षा जास्त दिवस खोकला असलेली कोणतेही व्यक्ती संशयित क्षयरोगी म्हणून संबोधण्यात यावी व त्या व्यक्तीची थुंकी/बेडका तपासण्यात यावा. ब) अति जोखमीच्या व्यक्ती बाबत--- ज्या व्यक्तीला २ आठवड्याहून कमी दिवसाचा खोकला असला तरी त्या व्यक्तीस संशियित क्षयरोगी म्हणून संबोधण्यात यावे. उदा.थुंकी नमुना दुषित क्षयरोगीच्या सह्वासित,एचआयव्ही बाधित व्यक्ती,मधुमेही व्यक्ती वृद्ध व्यक्ती,कुपोषित व्यक्ती,बालके,फुफ्फुसाचे इतर विकार असलेली व्यक्ती यात-सिलीकोसीस/दमा/अस्थमा इत्यादी.क) फुफ्फुसेत्तर संशियित क्षयरोगी—अश्या सर्व प्रकारच्या संशयित रोग्याची संपूर्ण तपासणी करून त्यास क्षयरोग असल्याची वा नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.असे केल्याने जास्तीत जास्त संशियित क्षयरोग्याची तपासणी होईल व समाजात एक ही क्षयरोगी निदान व उपचारा शिवाय राहणार नाही.  ‘’लवकर निदान लवकर उपचार’’ हा क्षयरोग नियंत्रणाचा व रोगी लवकर बरा करण्याचा पायाभूत घटक आहे.उपोरक्त लक्षने आढळ्यास त्या व्यक्तीने तत्काळ वैद्यकीय तपासणी करून क्षयरोग असल्याची वा नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.सिबीनेट मशीनद्वारे तपासणी---      एचआयव्ही ग्रस्त रुग्णांमधून संशयित क्षयरुग्णाच्या थुंकीची तपासणी एका दिवसात ,कमी वेळेत अचूकपणे केली जाते.तेव्हा सदरील तपासणी ही जिल्हा सामान्य रुग्णालय ,जळगाव येथे मे २०१५ पासून कार्यान्वित आहे.  क्षयग्रस्त असलेल्या रुग्ण यांना दिल्याजाणाऱ्या उपचार पद्धती खालील प्रमाणे- कॅट-१–    या उपचार पद्धतीत नव्याने निदान झालेला कोणत्याही अवयवाचा क्षयरुग्णांना  एकूण ६ महिने औषोधोपाचार घ्यावा लागतो.पहिले २ महिने(आयपी-उपचार) एक दिवसा आड डॉट सेंटर मध्ये येऊन उपचार देणाऱ्या समक्ष औषधे घ्यावयाची असतात.नंतर पुढील ४ महिने(सीपी-उपचार)आठवड्यातून एकदा ठराविक दिवशी डॉटस सेंटर मध्ये येऊन आठवड्याचे एक पाकीट घरी नेऊन आठवडाभर रोज औषधे घ्यावी लागतात. उपचार दरम्यान रुग्ण बरा होत आहे का.हे खात्री करण्याकरिता प्रत्येक २ महिन्यांनी ३ वेळा थुंकी तपासणी फुफ्फुसाच्या प्रदुर्भावीत क्षयरुग्णांनी करणे आवश्यक आहे. तिसरा थुंकी नमुनाचा निष्कर्ष योग्य आल्यास रुग्ण पूर्णता बरा झाला असे समजावे.कॅट-२ ---     ज्या रुग्णांनी प्रथम कॅट-१ औशोधोपचार कमीत कमी २ महिने अखंड पणे घेतलेला असेल,तसेच कॅट-१ चा ६ महिने उपचार पूर्ण केला असेल किंवा रुग्णाला इतर अवयवाचा टी.बी ग्रस्ताला वैद्यकीय सल्ल्या नुसार ६ महिन्याच्या वरील उपचाराची आवश्यता असल्याचा सल्ला दिला असेल अश्यांना तसेच,ज्या रुग्णांनी कॅट-२ चा उपचार कमीतकमी २ महिने किवा ८ महिने अखंड पणे पुंर्ण केला असेल व पुन्हा तो रुग्ण प्रदुर्भावीत झाला असेल अश्या सर्वाना कॅट-२ चा उपचार दिला जातो. या मध्ये रुग्णानी एकूण ८ महिने उपचार घ्यावयाचा असतो.याची विभागणी आयपी-उपचार ३ महिने गोळ्या व यात २ महिने कॅप्रेमायसीन चे इंजेक्शन एका दिवसाआड डॉटस मध्ये येऊन घ्यावे लागतात.व नंतरचे ५ महिने(सीपी-उपचार) आठवड्यातून ठराविक एक दिवस डॉटस सेंटरवर येऊन, आठवड्याचे एक पाकीट घरी नेऊन त्यातील औषधे रोज घ्यावे लागतात. उपचारा दरम्यान रुग्ण बरा होत आहे की नाही याची पडताळणी प्रथम थुंकी नमुना ३ महिन्यांनी(आयपी-उपचार संपताना),दुसरा थुंकी नमुना ७० ते ७५ दिवसांनी(सीपी-उपचारचा मध्य कालावधीत),तिसरा थुंकी नमुना पूर्ण उपचार संपल्या नंतर तपासावा लागतो.तसेच तिसरा थुंकी नमुनाचा निष्कर्ष योग्य आल्यास रुग्ण पूर्णता बरा झाला असे समजावे..