चीनमधून नेहमीच अशा काही घटना ऐकायला मिळतात की, आश्चर्याचा धक्काच बसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून डोकेदुखीची आणि चक्कर येण्याची समस्या होती. डॉक्टारांनी त्याला फिट येण्याची समस्या असल्याचं सांगितलं आणि त्यासंबंधी औषधांचं तो सेवन करत होता. पण नंतर जे सत्य समोर आलं त्याने सगळेच हैराण झाले.
asiaone.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गुआंगदोंग प्रांतातील डोंगराळ गावात राहणाऱ्या ५९ वर्षीय झांग यांना सर्वातआधी १९८९ मध्ये असह्य डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या सुरू झाली. त्यावेळी ते त्यांच्या मित्रांसोबत बसून गेम खेळत होते. अचानक त्यांच्या खांद्यामध्ये आणि पायांमध्ये वेदना सुरू झाल्या. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले.
(Image Credit : sleepbubble.com) (
बेशुद्ध झाल्यावर झांग यांना ग्वांगझू येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना फिट येण्याची समस्या आहे. त्यानुसार त्यांना औषधे दिली. पण झांग यांची डोकेदुखी, चक्कर येणं, बेशुद्ध होणं आणि शरीरात झिणझिण्या येण्याची समस्या काही दूर झाली नाही.
(Image Credit : scmp.com)
मात्र, २०१५ मध्ये त्यांची समस्या फार जास्त वाढली. त्यावेळी गावात आग लागली होती. तेव्हापासून त्यांची डोकेदुखीची समस्या अधिक बळावली. तसेच जास्त वेळा चक्कर येऊन बेशुद्धही होऊ लागले होते.
(Image Credit : asiaone.com) (झांग यांच्या मेंदूतून काढलेला किडा)
नंतर ते पुन्हा एकदा डॉक्टरकडे गेले. पण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा तेच फिट येण्याचं कारण सांगितलं. मात्र, झांग हे दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. त्यांनी झांग यांचा एमआरआय स्कॅन केला. तेव्हा त्यांचं डोकेदुखीचं खरं कारण समोर आलं. झांग यांच्या मेंदूत एक १० सेंटीमीटर लांब किडा होता. हा किडा सर्जरी करून काढण्यात आला. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हा किडा गेल्या ३० वर्षापासून जिवंत होता. हे पाहून डॉक्टरही चक्रावून गेले होते.
(Image Credit : Pixabay)
झांग यांचं ऑपरेशन करणारे डॉक्टर यान जुईकियांग यांच्यानुसार, नदीचं पाणी प्यायल्याने किंवा अर्धा शिजलेला झिंगा खाल्ल्याने असं इन्फेक्शन होऊ शकतं. जसं झांग यांना झालं होतं. झांग हे गावात नदीचंच पाणी पित होते आणि झिंगे खूप खात होते. डॉक्टरांचं मत आहे की, यामुळे झांग यांना डोकेदुखीची समस्या झाली होती.