शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

कोरोना काळात लहानग्यांच्या चिडचिडेपणामुळे चिंतीत असाल; तर हे आहेत सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 3:05 PM

लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने लहान मुलांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रीणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा. मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे.

या कोरोना महामारीचा परिणाम सर्वात जास्त कुणावर होत असेल तर तो आहे आपल्या घरातील लहान मुले. बाहेरील नकारात्मकता लहान मुलांना लगेच जाणवते कारण ते मोठ्या माणसांपेक्षाही संवेदनशील असतात. या लॉकडाऊनच्या काळात सतत घरात राहिल्याने त्यांची भरपूर चीडचीड होते. बाहेर जाऊन खेळणे नाही, मित्रमैत्रिणींना भेटणे नाही. घरात बसून तो ऑनलाईन अभ्यास आणि आई-बाबा.मग अशावेळी पालकांवरच जबाबदारी येते की लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांनी ठिक राखावे. यावरच्या उपाययोजना खूप कमी आईवडिलांकडे असतात. श्रीनगरच्या फेहर मेडिकल ट्रस्टचे साइकॅस्ट्रीस्ट काउंसीलर डॉ. आरिफ मगरीबी खान यांनी मुलांना घरच्याघरी हसत खेळत ठेवण्याचे काही पर्याय सांगितले आहेत. काय आहेत ते पर्याय जाणून घेऊया?

आजीआजोबांच्या गोष्टीआपल्या लहानपणी आजीआजोबांकडून विविध गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. रात्रीच्या वेळी झोप येण्यापुर्वी आपण आजी आजोबांच्या कुशीत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत झोपायचो. आताच्या छोट्या कुटुंबपद्धतीत हा आनंद मुलांपासून दुरावला आहे. त्यामुळे मुलांना पुन्हा आजीआजोबांनी सांगितलेल्या गोष्टी सांगण्याची वेळ आली आहे. त्यांना दंतकथा, परीकथा, पौराणिक गोष्टी, पंचतंत्र, संतांच्या गोष्टी अशा अनेक गोष्टी तुम्ही सांगू शकता. जेणेकरून त्यांचे तर मनोरंजन होईलच पण तुमचेही बालपण तुमच्याकडे आल्यासारखे वाटेल.

इंडोर गेम्सकॅरम, सापशिडी, पत्ते, व्यापार खेळ असे अनेक खेळ तुम्ही या काळात मुलांशी खेळू शकता. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य तर उत्तम राहतेच पण त्यांच्या बुद्धीलाही खुराक मिळतो. लहानपणी तुम्ही कोणते खेळ खेळायचात याच्या आठवणीही तुम्ही मुलांना सांगू शकता

विविध पदार्थ करून खायला घालणेया लॉकडाऊन (lockdown) च्या काळात मुलं सर्वात जास्त कोणती गोष्ट मिस करत असतील तर ते म्हणजे बाहेरचे पदार्थ. नेहमी बाहेर पडल्यावर ते जे पदार्थ खाण्यासाठी तुमच्याकडे हट्ट करत असतील ते पदार्थ घरच्या घरी त्यांना खाऊ घाला. ज्यामुळे मुलं तर आनंदी राहतीलच पण घरातल्या घरात असे पदार्थ बनवल्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवता येईल.

लहान मुलांना एखादी स्पर्धा देणेया कोरोनाकाळात तुम्ही एक करू शकता ते म्हणजे लहान मुलांना एखादे काम देऊन ते पुर्ण केल्यास त्यांना भेटवस्तू देण्याचे कबूल करू शकता. यामुळे ही मुले घरात असूनही जास्त अ‍ॅक्टिव्ह होतील. त्यांचे मानसिक आरोग्यही सुधारेल.

सकारात्मक विचारलास्ट बट नॉट द लिस्ट, हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. लहान मुलांना तुम्ही या काळात सकारात्मक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. टीव्हीवरील कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांपासून त्यांना दूर ठेवा. त्यांना समजवा की हे फार कमी काळासाठी आहे, आपण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत. त्यांना कोरोनाकाळातील योद्धांच्या सकारात्मक गोष्टी सांगा त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आणि या काळातही लहान मुले सकारात्मक राहतील.

लहान मुले हे देशाचं भवितव्य आहे. आपल्या देशातील लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. या वयात त्यांच्या मनावर जो परीणाम होतो तो कायमस्वरुपी राहतो. हा जर नकारात्मक असेल तर त्याची फळंही नकारात्मकच असतील. त्यामुळे पालकांनो काळजी घ्या या नकारात्मक काळात पाल्यांना जास्तीत जास्त सकारात्मक ठेवा, त्यांचे मनोबल वाढवा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सParenting Tipsपालकत्व