शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Weight loss tips: जेवताना तुम्हीही करत असाल 'या' चूका तर वजन वाढणं नक्की, वेळीच आवरा या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 4:48 PM

आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे तर असते, पण अनेकांना त्यासाठी हार्ड वर्क करायचे नसते. कित्येकांना वजन कमी करायचं असतं पण वर्कआउट्सचा कंटाळा येतो किंवा विविध कारणांनी करता येत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करणं हे स्वप्नवत वाटतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जर आपण हार्ड वर्क न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते प्रत्यक्षात शक्य आहे. यासाठी आपण खाण्याच्या सवयी सुधारू शकत असाल तर तुम्ही हे करू शकता. ExactDiteने दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

गोडाची लालसा –वास्तविक, जेव्हा आपण काहीतरी गोड खातो तेव्हा आपल्याला छान वाटते आणि आपण ते २ ऐवजी ४ खातो. यामुळे तुमची जेवणाची लालसा वाढते, त्यामुळे तुमच्या कंबरेचा आकारही वाढतो. जर तुम्ही गोड खाण्याची सवय बदलली तर तुमचे वजन आपोआप कमी होईल.

स्ट्रेस ईटिंग –तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्ट्रेस ईटिंगच्या आहारी जातात आणि भूक लागलेली नसतानाही खात राहतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ताणतणावात हेल्दी फूड्सऐवजी लोक फास्टफूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ जसे की आइस्क्रीम, कुकीज, चॉकलेट, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा खातात. हे पदार्थ वजन वाढवण्याचे काम करतात. हे पदार्थ टाळल्यास आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो.

निष्काळजीपणे खाणे –अनेकदा कंटाळा येतो आणि मग काही करायचं नसतं, अशावेळी लोकांना खायला आवडते. बरेच लोक विशेषतः टीव्ही पाहताना, फोन कॉल इत्यादींमध्ये निष्काळजीपणे खात राहतात. वास्तविक, आपल्या बेफिकीर खाण्याच्या सवयींमुळे आपले वजन वाढते. आजच या सवयी सोडा.

फास्ट खाणं –काही लोक चावल्या-चघळल्याशिवाय अन्न पटकन गिळतात आणि जेवणाचं काम पटकन फिन्निश झाल्याचं समजतात. वास्तविक, मेंदूला आपले पोट भरले आहे हे समजण्यासाठी 20 मिनिटे लागतात, पण काहीजण 5 मिनिटांत जेवतात, असे केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागते.

नाश्ता न करणं –बरेच लोक सकाळी लवकर काही खात नाहीत. असं करणं चुकीचं आहे, सकाळी वेळेत खाल्ल्याने आपले चयापचय सुधारते आणि आपली रक्तातील साखर सुरळीत राहते. वजन कमी करण्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स