तुम्ही म्हणाल की, आंघोळ करण्याची कसली आली पद्धत? ज्याला जसं वाटेल तसा आंघोळ करेल ना! तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही असा विचार करुन चुकताय. खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीसारखी आंघोळ करण्याचीही एक पद्धत आहे. जर त्या प्रमाणे आंघोळ केली गेली नाही तर आंघोळ करताना लखवा मारणे किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. त्यामुळे चला जाणून घेऊ आंघोळ करण्याची योग्य पद्धत....
आंघोळ करण्याची चुकीची पद्धत
अनेक लोकांना अशी सवय असते की, ते बाथरूमध्ये गेल्या गेल्या थेट शॉवरखाली उभे राहतात किंवा तांब्याच्या मदतीने बकेटीतील पाणी थेट डोक्यावर टाकू लागतात. ही आंघोळ करण्याची चुकीची पद्धत असल्याचं सांगितलं जातं. असे केल्याने स्ट्रोकसहीत आणखीही काही समस्या होऊ शकतात.
शरीरातील रक्तप्रवाह
आपल्या शरीरात रक्तप्रवाह हा वरुन खाली अशाप्रकारे होतो. अशात जर तुम्ही थेट डोक्यावर थंड पाणी टाकून आंघोळ करत असाल तर डोक्यातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात. त्यामुळे आंघोळ करताना डोक्यावर पाणी टाकण्यास सुरुवात करू नका.
नस फाटण्याचा धोका
डोक्यावर थेट पाणी टाकल्याने डोकं थंड होऊ लागतं. ज्यामुळे हृदयाला डोक्याकडे जास्त वेगाने रक्त पुरवठा करावा लागतो. यामुळे एकतर हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा मेंदूची नस फाटण्याचीही शक्यता असते.
सुरूवात पायांपासून
आंघोळीची सुरूवात पायांपासून करावी असे सांगितले जातं. पायाच्या पंज्यावर पाणी टाका. त्यानंतर जांघ, पोट, हाथ आणि खांद्यावर पाणी घ्या. नंतर डोक्यावर टाकावे.