अनेकदा आपल्याला अपूरी झोप किंवा थकवा आल्यामुळे जांभई येते. पण जर गरजेपेक्षा जास्त जांभई येत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं फार गंभीर आजारांना आमंत्रण ठरू शकतं. बऱ्याचदा आपल्याला गरजेपेक्षा जास्त जांभई येते. अशात आपला समज होतो की, झोप अपूर्ण राहिल्यामुळे किंवा थकवा आल्यामुळे आपल्याला जांभई येत आहे. पण इथेच आपण चुकतो. जास्त जांभई येण्याचं कारण आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक गंभीर आजारांमुळेही असू शकतं. जाणून घेऊयात, जास्त जांभई येण्यामुळे धोका संभवणाऱ्या आजारांबाबत...
1. लिव्हर खराब होण्याचे संकेत
लिव्हरवर वाईट परिणाम होण्याच्या स्थितीमध्ये शरीर फार लवकर थकतं. शरीराला थकवा आल्यानंतर आळस येतो आणि परिणामी जांभई देखील येते. जेव्हाही आपल्याला सतत जांभई येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर चेक करून घेणं गरजेचं असतं.
2. हृदयाशी निगडीत आजारांचे कारण
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, हृदयाशी संबंधित आजार आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांमुळेही सतत जांभई येते. जेव्हा हृदय आणि फुफ्फुस व्यवस्थित काम करत नाही त्यावेळी अस्थमाचा त्रास होतो. जर वेळीच ही लक्षणं दिसून आली आणि त्यावर योग्य ते उपचार केले तर योग्यवेळी हा त्रास दूर करता येतो.
3. ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता
काही संशोधनातून असं समोर आलं आहे की, ब्रेन स्टेजमध्ये जखमा झाल्याने देखील जास्त जांभई येते. तसेच ब्रेनमध्ये पिट्यूटरी ग्लेंड दाबली गेल्यामुळे जास्त जांभई येते.
4. बीपी आणि हृदयाचे ठोके कमी होणं
बऱ्याचदा तणावामुळे शरीरातील ब्लडप्रेशर वाढतं आणि हृदयाचे ठोके संथ गतीने पडतात. असं झाल्याने ऑक्सिजन ब्रेनपर्यंत पोहोचत नाही. या स्थितीमध्ये जांभईमार्फत शरीरात ऑक्सिजन पोहचतो. जर तुम्हालाही गरजेपेक्षा जास्त जांभई येत असेल तर एकदा तरी डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या.
5. रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी
जास्त जांभई येणं डायबेटीज मधील हायपोग्लायसीमियाचे सुरूवातीचे संकेत आहेत. जेव्हा शरीरामध्ये रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते त्यावेळी जांभई येण्यास सुरूवात होते. जर तुम्ही डायबिटीजचे रूग्ण आहात आणि तुम्हाला जास्त जांभई येत असेल तर डॉक्टरांच्या सल्लाने एकदा चेकअप करून घ्या.
6. थायरॉइड
सतत जांभई येणं हायपोथायरॉयड डिस्मचे संकेत आहेत. शरीरात थायरॉइड हार्मोन कमी झाल्याने सतत जांभई येते.