शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Yoga Day 2019 : योगा आणि एक्सरसाइजसाठी वेळ नाही? केवळ सूर्यनमस्कारही आहे पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 9:46 AM

International Yoga Day 2019 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. योगाभ्यास करुन आरोग्य कसं चांगलं ठेवावं हे सांगितलं जात आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असून योगाभ्यास करायला मिळत नाही.

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. योगाभ्यास करुन आरोग्य कसं चांगलं ठेवावं हे सांगितलं जात आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असून योगाभ्यास करायला मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अनेकांना वेळच मिळत नाही. पण योगाभ्यास करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ पुरेसा असतो. त्यातल्या त्यात वेगवेगळी आसने केलीच पाहिजे असेही नाही. केवळ एक सूर्यनमस्कार केला तरी सुद्धा तुम्ही फिट राहू शकता.

अनेकांना व्यायाम करणा-यांना आपण सूर्यनमस्कार करताना बघत असतो. अनेक कार्यक्रमांमध्येही सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले जातात. पण अनेकांचा सूर्यनमस्काराने बॉडी बनते असाच समज असतो. मुळात त्याचे नेमके फायदेच अनेकांना माहिती नसतात. त्यामुळे सूर्यनमस्काराचे नेमके काय फायदे होतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सूर्यनमस्कार आणि योगा यामुळे संपूर्ण शरिर निरोगी आणि तेजस्वी राहतं. सूर्यनमस्कार लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी लाभदायक आहे. दररोज सूर्यनमस्कार केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच आरोग्याशी संबंधीत समस्या टाळता येतात.

(Image Credit : Thriive.in)

सूर्यनमस्कार 12 योगासनं मिळून बनला आहे. हे योगासन खूपच सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात. शास्त्रांनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात सुर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे…

१) उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातले तर ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते.

२) सूर्यनमस्काराने चेह-यावर तेज येतं आणि चेहरा आणखी खुलतो. 

(Image Credit : The Statesm)

३) शरीर लवचिक होणे, चरबी कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे

४) दररोज सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण शरीराचे मसल्स मजबूत आणि लवचिक होतात.

५) छातीचे स्नायू बळकट होतात व श्वसन संस्थेसाठी उपयुक्त...

६) पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.

७) सूर्यनमस्कारामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात रक्तात पोहोचतं.

८) शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते.

९) स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगी ठरतात.

(Image Credit : Being The Parent)

१०) कंबर व पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू बळकट होतात व यकृतासारख्या पोटातील अवयवांसाठी उपयुक्त.

११) पाठीचा कणा लवचिक होतो. स्नायू मजबूत होतात व कंबर लवचिक होते.

सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या वेळी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगFitness Tipsफिटनेस टिप्स