पीसीओडीची समस्या महिलांमध्ये सगळ्यात जास्त वेगाने वाढताना दिसून येते. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड रिसर्चनुसार देशात सुमारे १० टक्के महिला या पीसीओडीच्या समस्येने त्रस्त आहेत. या आजारात शरीरातील हार्मोनल इंबॅलेंसमुळे शरीरावर केस मोठ्या प्रमाणावर उगवत असतात.
(image credit-vikram hospital)
काय असते पीसीओडीची समस्या
आत्तापर्यंत या आजाराचे ठोस कारण माहीत झालेले नाही पण एक्सपर्टसच्यामते सगळ्यात जास्त ताण-तणाव, रात्री उशीरापर्यंत जागे राहणे, स्मोकिंग आणि ड्रिंकीगमुळे ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते. कारण त्यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडतं. काहीजणांना अनुवांशिक स्वरूपातून ही समस्या उद्भवत असते.
या महिलांना जास्त उद्भवतो त्रास
एक्सपर्ट्सच्यामते पीसीओडीची समस्या अशा महिलांना होते. ज्या महिला नाईट शिफ्टमध्ये काम करत असतात. रात्रभर जागणे, उशीरा जेवण करणे यांमुळे लाईफस्टाईलचं नुकसान होत अटसते. कारण त्यामुळे त्यांना ही समस्या उद्भवते.
आधीच्या काळात फक्त जास्त वय असलेल्या महिलांनाच पीसीओडीची समस्या असायची. पण आता १५ ते १६ वर्ष वयोगटात सुद्धा या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. यामध्ये चेहरा आणि शरीराचे केस खूप जास्त दाट उगवतात. तसंच मासिक पाळीत खूप त्रास होत असतो. रक्तस्त्राव सुद्धा अधिक होतो तर कधी खुप कमी होतो. ही समस्या उद्भवल्यानंतर महिलांना गर्भधारणेसाठी त्रास होण्याची शक्यता असते. या आजारात वजन वेगाने वाढत असतं. शरीरात खूप विकनेस जाणवत असतो.
योगा पीसीओडीवर उपाय
योगाच्या माध्यामातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते. कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक, शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो. मेंटल टॉक्सीन्स आणि फिजिकल टॉक्सिन्सना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. आज आम्ही तुम्हाला अशा योगासनांबद्दल सांगणार आहोत. ही योगासनं करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. उष्ट्रासन, बटरफ्लाय आसन आणि मार्जरी आसन म्हणजेच कॅट पोज आणि सुर्य नमस्कार करून तुम्ही हा आजार होण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता.
बटर फ्लायआसन
सूर्य नमस्काराचे फायदे
नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसनं आहेत. यामुळे तुम्ही आपल्या सेक्शुअल हेल्थची सुद्धा काळजी घेऊ शकता. ( हे पण वाचा-'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!)