गेल्या काही वर्षांमध्ये योगाभ्यासात काही बदल बघायला मिळत आहेत. लोक अलिकडे फिटनेससाठी योगाभ्यासाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. हाच योगाभ्यासात वेगळेपणाचा ट्रेन्ड पुढे नेत लंडनच्या लेक जिल्ह्यातील एका लक्झरी हॉटेलमध्ये खासप्रकारचा योग सुरु करण्यात आला आहे. याला लेमोगा असं नाव देण्यात आलं आहे. कारण हा योगाभ्यास लेमर नावाच्या एका माकड्याच्या प्रजातीसोबत केला जातो. हॉटेल त्यांच्या वेलनेस प्रोग्रामसोबत याचं लॉन्चिंग केलं आहे. लेमूर मेगागास्करमध्ये आढळणारा प्राणी असून त्याच्या शेपटीवर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत.
(Image Credit : Insider)
वाइल्ड लाइफ पार्कचे मॅनेजर रिचर्ड रॉबिन्सन म्हणाले की, याची सुरुवात पार्टनर योगाभ्यासासारखी करण्यात आली आहे. योगाभ्यास करताना लेमूरला बघता तेव्हा ते सुद्धा मनुष्यांप्रमाणे शरीराची हालचाल करण्याचा प्रयत्न करतात. याने लोकांना योगाभ्यासात प्रेरणा मिळेल. हे प्राणी लेक डिस्ट्रीक वाइल्डलाइफ पार्कमधून आणण्यात आले आहेत.
योगाभ्यासाशी निगडीत केरोलिन ग्रेफ्स ने सांगितले की, लेमोगो क्लासेस, हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आणि पाहुण्यांचा तणाव दूर करण्याचं काम करतात. निसर्ग आणि लेमूरसोबत त्यांना योगाभ्यास करुन वेगळाच अनुभव मिळतो. यादरम्यान लेमूर लोकांसोबत खेळतात सुद्धा.
लेमोगो क्लासेसचं इंटरनेटवर फार कौतुक केलं जात आहे आणि लेमूरला नैसर्गिक योगी असं नाव देण्यात आलं आहे. हा उपक्रम हॉटेल आणि लेक डिस्ट्रीक वाइल्डलाइफने एकत्र मिळून सुरु केला आहे. ४०० एकर क्षेत्रफळात परिसरात असलेल्या या पॅकेजची सुरुवात ४५ हजार रुपयांपासून होते. यात योगाचं एक सेशन, रात्रभर राहणं, नाश्ता, स्पा आणि डिनरचा समावेश आहे.