योगासने करा निद्रानाश टाळा !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 4:16 PM
अधिकचा ताणतणाव, बदलती जीवनशैली, व्यसनाधिनता आदी अनेक कारणाने गेल्या बहुतांश लोकांना निद्रानाश समस्येने ग्रासले आहे. अनेक उपाययोजना करुनही ही समस्या जाता जात नाही.
-रवीन्द्र मोरे अधिकचा ताणतणाव, बदलती जीवनशैली, व्यसनाधिनता आदी अनेक कारणाने गेल्या बहुतांश लोकांना निद्रानाश समस्येने ग्रासले आहे. अनेक उपाययोजना करुनही ही समस्या जाता जात नाही. एका अभ्यासानुसार योगासनांमुळे निद्रानाश समस्येपासून नक्कीच सुटका मिळू शकते असे निदर्शनास आले आहे. निद्रानाश होण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी अती प्रमाणात कॅफेन सेवन केल्याने रात्री झोप येत नाही. त्याचप्रमाणे झोपताना रात्री उशिरापर्यंत टी. व्ही. पाहिल्यामुळे तुमचा मेंदू कार्यान्वित होऊन निद्रानाश होऊ शकतो. वैयक्तिक योगा प्रशिक्षक व मानसोपचार समुपदेशक यांच्या मते पुढे वाकून व शयनस्थितीत केलेल्या काही योगासनांमुळे झोप लागण्यास मदत होते. त्याचप्रमाणे झोपून श्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरावामुळे देखील चांगला आराम मिळू शकतो. तसेच श्वास सोडण्याचा कालावधी वाढवल्यामुळे मज्जासंस्थेमधील स्नायूंना संदेश पोहोचवणारी कार्यप्रणाली कार्यान्वित होते. ही मज्जासंस्थेमधील महत्वाची कार्यप्रणाली असते. त्यामुळे शरीर आरामाच्या स्थितीत स्थिरावते. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.निद्रानाश टाळण्यासाठी कोणती आसने कराल?पश्चिमोत्तासन-या आसनामुळे तुम्हाला ताण न येता आराम मिळतो. या आसनात सुरूवातीला जरी तुम्ही अंगठयाला स्पर्श नाही करु शकलात तरी कालांंतराने व सरावाने तुम्ही या आसनातील आदर्शस्थिती नक्कीच गाठू शकता.उत्तानासन-या आसनस्थितीमुळे डोक्याला रक्तपुरवठा होतो. मेंदूला संदेश पोहोचविणाऱ्या मज्जासंस्थेच्या कार्यप्रणालीला कार्यान्वित केल्यामुळे शरीराला आराम मिळतो.अपनासन-या आसनामुळे पाठीला आराम मिळतो. मान व मांड्यांचे स्नायू ताणले जातात.सुप्त बद्धकोनासन-या आसनामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही आराम मिळेल. तसेच पाय व पाठीच्या स्नायूंवर ताण येईल.सदर आसने कोणी करावीत व कोणी करु नयेत?निरोगी शरीर प्रकृती असलेली कोणतीही व्यक्ती तिच्या शारीरिक क्षमतेनुसार ही योगासने करु शकते. काही व्यक्तींना ही आसने न करण्याचा सल्ला देण्यात येतो. स्पॉन्डिलायटीस व उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी पुढे वाकणारी योगासने करणे टाळावे. पाठीच्या मणक्याचा त्रास असणाऱ्या लोकांनी देखील ही आसने योगतज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावीत. तसेच आसन करताना जास्त ताण घेऊन आसने करू नयेत. आसन करताना तुम्हाला कोणताही त्रास जाणवत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरप्रकृतीमध्ये काहीतरी बिघाड आहे. त्यामुळे आसन करण्यापूर्वी योगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. निद्रानाश होण्याचे नेमके कारण समजल्यास या आसनांचा सराव केल्याने नक्कीच आराम मिळू शकतो. घरी स्वत:च्या मनाने योगासने केल्याने तुम्हाला योग्य फायदा होईलच असे नाही. यासाठी योगतज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे या आसनांचा नीट अभ्यास करुनच ही आसने करा.