शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

व्यायामाला वेळ नाही? मग फक्त उभे राहा, तुमच्या कॅलरीज अन् फॅट्स चुटकशीसरशी बर्न होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 1:17 PM

तुम्ही उभं राहून काम केलंत तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते. रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं. तर मग जाणून घेऊया उभं राहून कसं काय फॅट बर्न करता येतं ते.

व्यायाम करणं (Exercise) हे महत्त्वाचं आहे पण सध्या घरी बसून कॉम्प्युटरवर काम करण्याची पद्धत रूढ झाली आहे त्यामुळे अनेकां व्यायामाला वेळच मिळत नाही. बसून-बसून पाठीला बाक येतो. कॉम्प्युटर स्क्रीनमुळे  डोळ्यांवर ताण येतो तरीही तसंच काम करत रहावं लागतं. पण याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणं (Weight Gain), इतर व्याधी जडणं हे दिसायला लागले की माणूस व्यायाम करण्याचे मार्ग शोधू लागतो. आम्ही आज तुम्हाला काही अशा छोट्या युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅलरी काही प्रमाणात बर्न (Burning Calories) करता येतील.

हेल्थशॉट्स या वेबसाइटवर युरोपियन हार्ट जर्नलमधील एक संशोधन प्रकाशित झालं आहे. त्यानुसार तुम्ही उभं राहून काम केलंत तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते. रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं. तर मग जाणून घेऊया उभं राहून कसं काय फॅट बर्न करता येतं ते.

स्टँडिंग डेस्कचा वापर करासाधारणपणे सर्वजण ७ ते ८ तास एकाजागी बसून काम करतात. तुम्हीही तसं करत असाल तर तुम्ही स्टँडिंग डेस्कचा (Standing Desk) वापर करा. म्हणजे तुमच्या डेस्कच्या जवळ उभं राहून काम करा जेणेकरून कंबरेखालच्या भागात रक्ताभिसरण सुधारेल आणि तुम्हाला शरीरातील जादाची चरबी बर्न करायला मदत होईल.

मल्टिटास्कर व्हातुम्ही मल्टिटास्कर होण्याचा प्रयत्न करा. उदाहरणच द्यायचं झालं तर हे बघा तुम्ही जर जास्तवेळ कॉन्फरन्स कॉलवर बोलत असाल तर ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडसेट वापरून चालता-चालता कॉलवर बोला. यामुळे तुमच्या मीटिंग सुरूही राहतील आणि चालल्यामुळे शरीरी क्रियाशील राहून कॅलरीही जळतील.

सक्रियता वाढवाशक्य असेल तेवढं कामातून छोटा ब्रेक घ्या शरीराला सक्रिय करा म्हणजे हातपाय हलवा, चाला किंवा वॉर्मिंग अप व्यायाम (Warming Up) करा. असे सक्रिय राहिलात तर तुमचा मूडही सुधारेल आणि कामात लक्षही लागेल. त्याचबरोबर ऑफिसात जाताना लिफ्टऐवजी (Elevator) जिन्याचा वापर करा. तुमची गाडी ऑफिसच्या मुख्य इमारतीपासून दूर पार्क करा म्हणजे तिथून चालत तुम्हाला ऑफिसात जाता येईल. चालणं झालं की आपोआप कॅलरी बर्न होतील.

ट्रॅकिंग करास्मार्ट वॉचचा वापर करा आणि आपण दिवसात किती पावलं चाललो हे ट्रॅक करा. आज १ हजार पावलं चाललो तर दुसऱ्या दिवशी १ हजार ५०० पावलं चालण्याचं उद्दिष्ट निश्चित करा जेणेकरून आणखी थोडी प्रगती होईल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वत: ला प्रेरित करण्यासाठी आदल्यादिवशी आपण १ हजार पावलं चालल्याचं ट्रॅकिंग रेकॉर्ड  मदत करेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स