- नितांत महाजनआपल्याला खूप राग येतो. काय करणार, स्वभावाला औषध नाही असं म्हणून आपण आपली आणि इतरांची समजून काढतो. लोकही म्हणतात की तसा स्वभावानं चांगला आहे तो, पण चिडतो फार. हे सारं अनेकजण भूषण म्हणून मिरवतातही. म्हणतातही , आता माझी सटकली म्हणता खरं पण नुस्तं डोकंच नाही तर शरीरातही बराच गडबड गुंडा होत असतो. तो ही समजून घ्या..ज्यांना अती राग येतो, त्यांना हे त्रास होवू शकतात..१) फुफ्सुसांना त्रासमूड चेंज होतात त्याचा परिणाम श्वसनावर होतो. श्वासावर होणारा हा परिणाम फुफ्फुसावर आणि फुप्फुसाच्या क्षमतेवरही होतो.
२) वय वाढण्याचा वेग वाढतोराग येतो, चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या येतात, अॅसिडीटी वाढते, त्यानं एजिंग चा स्पीड वाढतो असं अभ्यासक म्हणतात.
३) अटेन्शन स्पॅन कमीज्यांना राग जास्त येतो, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. ते लक्ष एकाग्र करू शकत नाहीत.
४) झोप उडतेराग येतो, चिडचिड होते. त्याचा परिणाम झोपेवर होतो. ज्यांना जास्त राग येतो त्यांना झोपेची समस्या दिसते.५) इम्युनिटी कमी होतेप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते कारण चिडल्यानं खाण्यापिण्यावर परिणाम होतो.
६) हार्ट अटॅकची शक्यता बळावतेसतत चिडचिड, राग, संताप,अन्झायटी, स्ट्रेस आणि अॅसिडीटी या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हार्ट अटॅकची शक्यता वाढते.७) डिप्रेशनअनेकांना सतत चिडचिड करावी लागते, किंवा होते कारण मनाच्या तळाशी कुठंतरी डिप्रेशन असतं. ते वाढतं.८) वजन वाढराग येतो, त्यानं खाणं वाढतं. ज्यांना राग जास्त येतो त्यांनी कितीही डाएट केलं, कमी खाल्लं तरी वजन चटकन कमी होत नाही असं अभ्यासक म्हणतात.९) लोकांशी भांडणहा आजार नाही पण सतत इतरांशी भांडल्यानं मानसिक स्वास्थ्य, सामाजिक प्रतिमा बिघडते.१०) आत्मविश्वास कमीज्यांना राग जास्त येतो, त्यांचा आत्मविश्वास अनेकदा कमी असतो. लोक आपल्याला कमी लेखतात असा त्यांचा समज असतो. तो वाढतो.