पावसाळ्यात अनेक विविध भाज्या खव्व्यांच्या दिमतीला सज्ज असतात. पण पावसाळ्यात रानभाज्यांची मजाच काही और आहे. या भाज्यांची लागवड होत नाही. जंगलात, रानात या भाज्या आपोआप उगवतात. या भाज्या अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. आदिवासी लोकं या भाज्या रानात उपलब्ध असल्याने अगदी एकही पैसा न मोजता खातात. पण शहरी भागातील लोक याच आदिवासी बांधवांकडून त्या खरेदीही करतात. सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी अशाच एका भाजीचे महत्व सांगितले आहे ती म्हणजे पावसाळ्यात माळ रानावर उगवणारी शेवळा भाजी. या शेवळ्याच्या भाजीला इंग्रजीत ड्रॅगन स्टॉक याम या नावानेही ओळखले जाते. ही भाजी डोंगरांवर उगते. विशेष म्हणजे ही भाजी उगवल्यानंतर ६ ते ७ दिवसच आढळते.
शेवळ्याची भाजी बनवण्याची पद्धतीशेवळ्याच्या भाजीची १ जुडी८-१०काकड्या४ कांदे७-८ लसणाच्या पाकळ्या१ चमचा मिरची पावडर२ चमचे तेलअर्धा चमचा हिंग१ चमचा गरम मसाला१ चमचा राई१ चमचा हळद२ टेबलस्पून खवलेला नारळकृतीशेवळ्याच्या खालील भागाला काढुन टाका. भाजी नीट चिरुन घ्या. काकडीच्या बिया काढुन त्याची पेस्ट बनवा. कुकरमध्ये तेल टाकुन राई, लसूण, हळद, हिंग, मसाले एकत्र करून घ्या. त्यात चिरलेला शेवळा टाका, काकडीची पेस्ट टाका. वरुन खवलेला नारळ टाका. शिजवून घ्या आणि भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
शेवळ्याच्या भाजीचे फायदेआतड्यांमधील बॅक्टेरिया दूर करतेया भाजीत फायबर जास्त असल्याने वजन घटतेशेगळ्याची पोटासाठी उत्तम असते, त्यामुळे पोटाचे विकार दूर होतात