Sudden Cardiac Death: आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण हृदय मजबूत असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही समस्या होणार नाहीत. हृदयाचं धडधडणं अचानक थांबलं तर त्याला कार्डियाक अरेस्ट म्हटलं जातं. याचे ना कोणते संकेत दिसतात ना काही इशारा मिळतो. हा अटॅक हृदयात समस्या झाल्यामुळे येतो. हे पूर्णपणे कॉम्प्युटरच्या सिस्टमप्रमाणे असतं. ज्याप्रकारे कॉम्प्युटरचे तार एकमेकांना जुळलेले असतात तसंच हृदयाचं असतं. ज्याचे तार तुटल्याने अचानक कार्डियाक अरेस्ट येतो. चला जाणून घेऊ याची कारणे....
काय असतो कार्डियाक अरेस्ट?
अनेक लोकांना वाटतं की, कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकचं एक रूप आहे. पण असं अजिबात नाहीये. कार्डियाक अरेस्ट हा हृदयातील आतील भागात काही बिघाड झाल्याने येतो. म्हणजे हृदयाचं काम आहे रक्त शुद्ध करणं आणि शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा करणं. जर यात काही बिघाड झाला तर समस्या होते. याचा थेट प्रभाव हृदयाच्या गतीवर पडतो. ज्या लोकांना आधीच हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्यांना कार्डियाक अरेस्ट येण्याची जास्त शक्यता आहे.
कार्डियाक अरेस्टची लक्षणे
हृदयाची धडधड वेगाने होते
छातीत वेदना होणे
चक्कर येणे
श्वास घेण्यास समस्या होणे
लवकर थकवा जाणवणे
हार्ट अटॅक काय असतो?
आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे हार्ट अटॅकमुळे मृत्यूदर वेगाने वाढत आहे. ज्यामुळे अनेक लोक आपली लाइफस्टाईल चांगली करण्याच्या मागे लागले आहेत. पण जेव्हा कार्डियाक अरेस्टचा विषय येतो तेव्हा हार्ट अटॅकची शंका चिंता वाढवते. हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयाच्या काही भागांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. पण कार्डियाक अरेस्टमध्ये रक्तप्रवाह अचानक बंद होतो. हार्ट अटॅक नंतरही शरीरातील काही भागांमध्ये रक्तप्रवाह सुरू असतो. पण कार्डियाक अरेस्टच्या स्थितीत रक्तप्रवाह शरीरात पूर्णपणे बंद होतो.