(Image Credit : mirror.co.uk)
आपण नेहमीच ऐकत असतो की आळस फारच वाईट असतो. यात काही प्रमाणात सत्य असलं तरी १०० टक्के खरं नाही. कारण सायन्सचा विचार कराल तर आळशी असणं काही प्रमाणात मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं असतं. काही रिसर्चही यावर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ आळशी असण्याच्या काही फायद्यांबाबत. मात्र, आळशी असण्याचे काही फायदे आहेत म्हणून याचा अर्थ हा होत नाही की, तुम्ही आणखी जास्त आळशी व्हावं. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही वाईटच असते, हा निसर्गाचा नियम आहे.
बर्नआउट स्थितीपासून दूर
(Image Credit : betanews.com)
बर्नआउट ही ती स्थिती असते ज्यात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रूपाने इतका थकलेला असतो की, त्यांच्याकडे आणखी काही करण्याची ताकदच राहत नाही. आळशी लोकांना अशा स्थितीचा सामना कमी करावा लागतो. कारण ते सतत रिलॅक्स होण्यासाठी पर्याय शोधत राहतात.
स्ट्रेस मॅनेजमेंट
(Image Credit : parentingchaos.com)
बर्नआउटसोबत आळस स्ट्रेस मॅनेज करण्यासही मदत करतो. मुळात जे लोक आळशी लोकांच्या कॅटेगरीत येतात ते गोष्टी जास्त आरामात करतात, याने त्यांना तणाव किंवा एग्जांयटीची समस्या होण्याचा धोका कमीच असतो.
झोप न येण्याची समस्या राहते दूर
(Image Credit : mnn.com)
आळशी लोक डोक्यांने रिलॅक्स असतात, ज्याने त्यांना झोपण्यात काहीच अडचण येत नाही. त्यांना झोप चांगली येत असल्याने झोप न येण्याची समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही होत नाहीत. याने त्यांच्या शरीराचं इम्यून सिस्टीम चांगलं राहतं.
पचनक्रिया सुधारते
(Image Credit : santacruzayurveda.com)
झोप न होणे आणि स्ट्रेस याने खाण्याची इच्छा मारण्यासोबतच पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. तेच आळशी लोक प्रॉपर झोप घेतात आणि स्ट्रेसपासून दूर राहतात यामुळे ते या समस्येपासून दूर राहतात.
चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएटिविटी
(Image Credit : useoftechnology.com)
रिसर्चनुसार, आराम न करता सतत कामात असणाऱ्या लोकांच्या तुलनेत आळशी लोक जास्त फोकस असतात. इतकंच नाही तर असे लोक जास्त क्रिएटिव्हही असतात. असं डोकं शांत, रिलॅक्स असल्याकारणाने होतं. त्यामुळे त्यांचा फोकस क्लिअर असतो आणि त्यांना नविन आयडिया सुद्धा येतात.
भावनिक संतुलन
(Image Credit : increasingselfworth.com)
झोप पूर्ण होणे, स्ट्रेसपासून दूर राहणे, शरीर रिलॅक्स्ड असणे याने व्यक्तीच्या भावनाही स्टेबल राहण्यास मदत मिळते. हे वेगवेगळ्या रिसर्चमधूनही समोर आलं आहे की, ज्या लोकांना स्ट्रेस किंवा झोप कमी येण्याची समस्या असते ते लोक भावनांशी संबंधित समस्यांनीही पीडित असतात.
चांगलं रिलेशनशिप
(Image Credit : bustle.com)
इमोशनली स्टेबल असल्याकारणाने आळशी लोक रिलेशनशिपमध्येही चांगले राहतात. असं यामुळे होतं कारण आळसामुळे हे लोक नकळत का होईना आपल्या पार्टनरला स्वत:साठी पुरेसा वेळ काढण्याची संधी देतात. सोबतच एकाच जागेवर बसून तासंतास बोलणंही आळशी लोकांसाठी मोठी बाब नाही. याने त्यांना पार्टनरच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकणे आणि त्यांच्यासोबत चांगल्याप्रकारे इमोशनली कनेक्ट होण्यास मदत मिळते.