शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
7
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
8
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
9
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
10
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
11
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
12
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
13
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
14
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
15
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
16
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
17
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

का दिला जातो बदाम भिजवून खाण्याचा सल्ला? जाणून घ्या खरं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 6:27 PM

Soaked almonds benefits : बदाममध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे व्हिटॅमिन्स ई, जिंक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 अ‍ॅसिडचा स्त्रोत आहे. या सर्व पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवणे चांगलं मानलं जातं

Soaked almonds benefits : आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की, बदाम भिजवून खाल्ल्याने बुद्धीला चालना मिळते. हेही सर्वांनाच माहीत आहे की, बदाम आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, बदाम भिजवून खाण्याचे का सांगितले जाते? अनेकजण बदाम खातात पण याचा विचार कुणी करत नाही. चला जाणून घेऊया असे का सांगतात. 

बदाममध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे व्हिटॅमिन्स ई, जिंक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 अ‍ॅसिडचा स्त्रोत आहे. या सर्व पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवणे चांगलं मानलं जातं. चला जाणून घेऊया याचे फायदे...

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बदाम खाणे तुमच्यासाठी फायेदशीर आहे. बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते. एका अभ्यासानुसार, रोज एक मूठभर बदाम खाल्ल्याने तुम्ही काही दिवसातच बरंच वजन कमी करु शकता. यातील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट सुद्धा फायदेशीर आहे. भिजवलेल्या बदामात व्हिटॅमिन बी 17 आणि फोलिक अ‍ॅसिड असतं, जे कॅन्सरपासून सुरक्षा करतं. 

1. गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर  स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात. 

2. पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाइम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

3. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते 

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

4. हृदयाचे कार्य सुधारते 

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

5. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळी अवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढतात. 

6. वजन घटवण्यास मदत होते  

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार  बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य